Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात फायदेशीर मानला जाणारा सब्जा ‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक, जाणून घ्या सब्जा खाण्याची पद्धत

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सब्जा बियांचे सेवन केले जाते. पण याच सब्जा बिया काहींच्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात. चला तर जाणून घेऊया सब्जा बिया कोणी खाव्यात आणि कोणी खाऊ नये.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 07, 2026 | 08:28 AM
उन्हाळ्यात फायदेशीर मानला जाणारा सब्जा 'या' लोकांच्या आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक, जाणून घ्या सब्जा खाण्याची पद्धत

उन्हाळ्यात फायदेशीर मानला जाणारा सब्जा 'या' लोकांच्या आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक, जाणून घ्या सब्जा खाण्याची पद्धत

Follow Us
Close
Follow Us:

सब्जा खाण्याचे फायदे?
उन्हाळ्यात सब्जा बिया खाव्यात की नाही?
सब्जा बिया कोणी खाऊ नये?

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात बदल केला जातो. वाढत्या उष्णतेचा परिणाम शरीरावर होऊ नये म्हणून वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन केले जाते. कधी थंड दूध, ताक, दही, लस्सी प्यायली जाते तर कधी बाजारात विकत मिळणारे पॅक बंद सरबत प्यायले जातात. शरीराला आतून थंडावा देणाऱ्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला कायमच दिला जातो. अशावेळी सब्जाचे सेवन केले जाते. सब्जा खाल्ल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीरात वाढलेली उष्णता कमी करतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. सब्जा बिया फालुदा, सरबत किंवा विविध फळांपासून बनवलेली पेय बनवण्यासाठी केला जातो. उन्हाळ्यात वाढते पित्त आणि पोटाच्या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सब्जा बियांचे पाणी किंवा पेय बनवून प्यायली जातात.(फोटो सौजन्य – istock)

पोटाला सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच उपचार करून टाळता येईल मोठा धोका

सब्जा बियांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते, शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. पण सब्जा बियांचे सेवन केल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला फायदे होतीलच असे नाही. आरोग्यासंबंधित गंभीर समस्या आणि काही विशेष प्रकृती असलेल्या लोकांच्या आरोग्यासाठी सब्जा बियांचे सेवन करणे धोक्याचे ठरू शकते. याचे उलटे परिणाम शरीरावर होऊ शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या व्यक्तींनी सब्जा बियांचे अजिबात सेवन करू नये? सब्जा खाण्याची योग्य पद्धत? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.

सब्जा बिया कोणी खाव्यात?

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर अनेकांच्या शरीरात पित्त वाढते, छातीत जळजळ होणे किंवा आंबट ढेकर येणे इत्यादी पचनसंबंधित समस्या वाढू लागतात. पचनक्रिया बिघडल्यानंतर वारंवार उलट्या, मळमळ किंवा डोकं दुखण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा सब्जा बिया टाकून काहीवेळ भिजत ठेवा. त्यानंतर सब्जा बियांचे पाणी प्यावे. या बियांच्या सेवनामुळे पोटाच्या आतमध्ये संरक्षक कवच तयार होते, ज्यामुळे लिव्हरमधून अनावश्यक पित्त तयार होत नाही.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी सब्जा बियांचे सेवन करावे. कोणत्याही फळांचा रस बनवल्यानंतर त्यात भिजवलेल्या सब्जा बिया मिक्स करून प्यायला जातात. यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होऊन जळजळ थांबते. हातापायांची आग होणे, डोळे जळजळणे किंवा खूप घाम येणे इत्यादी सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सब्जा बियांचे सेवन करावे. या बिया शरीरात वाढलेली उष्णता शोषून घेतात.

सतत आंबट ढेकर येतात? जेवताना केलेली एक चूक शरीरासाठी ठरेल धोक्याची, अपचनाच्या समस्येवर करा ‘हे’ उपाय

सब्जा बियांचे सेवन कोणी करू नये?

लहान मुलांनी सब्जा बियांचे सेवन अजिबात करू नये. लहान मुलांना सब्जा बिया व्यवस्थित गिळता येत नाहीत, ज्यामुळे त्या घशात किंवा श्वसननलिकेत अडकण्याची भीती असते. त्यामुळे लहान मुलांना सब्जा बिया खाण्यास देऊ नये. याशिवाय कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी सब्जा बियांचे सेवन अजिबात करू नये. सब्जा बियांमध्ये असलेले जास्त फायबर लहान मुलांच्या पचनक्रियेवर परिणाम करते. वारंवार पोट फुगणे किंवा गॅस, आतड्यांचे आजार इत्यादी समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी सब्जा बियांचे सेवन करणे टाळावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सब्जा बियांचे उन्हाळ्यात सेवन का केले जाते?

    Ans: सब्जा बिया शरीराला थंडावा देतात, पचन सुधारतात आणि डिहायड्रेशन टाळण्यास मदत करतात, त्यामुळे उन्हाळ्यात त्यांचे सेवन फायदेशीर मानले जाते.

  • Que: सब्जा बिया कोणत्या लोकांसाठी घातक ठरू शकतात?

    Ans: लो ब्लड प्रेशर असलेले लोक, गर्भवती महिला, लहान मुले आणि काही औषधे घेत असलेले रुग्ण यांनी सब्जा बिया डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सेवन करू नयेत.

  • Que: सब्जा बिया खाण्याची योग्य पद्धत कोणती?

    Ans: सब्जा बिया १५-२० मिनिटे पाण्यात भिजवून फुगल्यानंतरच सेवन कराव्यात. त्या सरबत, दूध किंवा ज्यूसमध्ये मिसळून खाल्ल्या जाऊ शकतात.

Web Title: Sabja seeds side effects why this summer superfood may be dangerous for some people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 08:28 AM

Topics:  

  • Seeds and Fertilizer
  • summer care tips
  • Summer Food

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा काकडीचे सँडविच, चहा चपातीसाठी उत्तम पर्याय
1

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा काकडीचे सँडविच, चहा चपातीसाठी उत्तम पर्याय

Summer Drink: उन्हाळ्यात शरीर राहील थंड! झटपट घरी बनवा Melon-Mint Cooler, नोट करून घ्या रेसिपी
2

Summer Drink: उन्हाळ्यात शरीर राहील थंड! झटपट घरी बनवा Melon-Mint Cooler, नोट करून घ्या रेसिपी

उन्हाळ्यात चेहरा राहील फ्रेश! दह्यात ‘हे’ पदार्थ मिक्स करून लावल्यास त्वचेवर येईल कोरियन फेशिअलसारखा ग्लो
3

उन्हाळ्यात चेहरा राहील फ्रेश! दह्यात ‘हे’ पदार्थ मिक्स करून लावल्यास त्वचेवर येईल कोरियन फेशिअलसारखा ग्लो

उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम ठरतील ‘ही’ पुदिन्यापासून बनवलेली ताजी पेय, प्रत्येक घोटात जाणवेल ताजेपणा
4

उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम ठरतील ‘ही’ पुदिन्यापासून बनवलेली ताजी पेय, प्रत्येक घोटात जाणवेल ताजेपणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.