पॅकबंद वा कॅनमधील अन्न खाणे टाळा - सद्गुरूंचा सल्ला (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)
निरोगी राहण्यासाठी तुम्ही खात असलेल्या अन्नासोबत ते पदार्थ कशात ठेवले आहे याकडेही लक्ष द्यायला हवे. कारण त्या वस्तूचे गुणधर्म अन्नातून शरीरात प्रवेश करू शकतात. जर हे गुणधर्म हानिकारक असतील तर तुम्हाला कर्करोग आणि मधुमेहाचा धोका असू शकतो. याबाबत सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सांगितले की ते बंदडबा किंवा बाटलीत ठेवलेले कोणतेही अन्नपदार्थ खात नाहीत. ते म्हणाले की अन्न वनस्पतींमधून आले पाहिजे, कॅन किंवा बाटल्यांमधून नाही. पण तुम्ही हे निश्चितपणे एका विशिष्ट वेळी सेवन करू शकता.
सद्गुरु जग्गी वासुदेव म्हणाले की जर एखाद्या ठिकाणी अगदीच काही नाहीये आणि जीवनमरणाचा प्रश्न असेल तर तुम्ही डब्यात किंवा बाटलीत आलेले अन्न खाऊ शकता. परंतु ते सतत किंवा दररोज खाऊ नका. काही आजारांच्या बाबतीतही असे अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यात वेगळे पौष्टिक घटक जोडले जातात, याबाबत अधिक माहिती घेऊया (फोटो सौजन्य – Instagram/iStock)
90% BPA चा धोका
पॅकेज्ड वा कॅन्ड फूडमुळे होणारा त्रास
पॅकेज्ड केलेल्या पदार्थांमध्ये बीपीए केमिकल असते आणि हीच गोष्ट कॅनमधील पदार्थांनाही लागू होते. एका अभ्यासात, 78 कॅनमधील अन्नाचे नमुने घेण्यात आले, त्यापैकी सुमारे 90 टक्के BPA समाविष्ट होते असे समोर आले आहे. हे पदार्थ 5 दिवस सतत खाल्ले तर शरीरात जास्त प्रमाणात BPA होऊ शकतो. या रसायनामुळे कर्करोग, टाईप २ मधुमेह, हृदयविकार आणि इरेक्टाइल डिसफंक्शनचा धोका वाढतो असे सद्गुरूंनी आपल्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियावर सांगितले आहे.
बदाम खाण्यापूर्वी करा एक काम, कॅन्सरचा धोका होईल कमी, सद्गुरू जग्गी वासुदेवांचा सल्ला
मधुमेहाचा धोका
डायबिटीसचा त्रास ओढवून घेऊ शकता
पॅकबंद अन्न आणि पेयांमध्ये कृत्रिम गोड पदार्थ असू शकतात. हे गोड पदार्थ अथवा साखर रक्तात लवकर विरघळते आणि रक्तातील साखर वाढवून मधुमेहाला आमंत्रण देते. या गोष्टींचे दीर्घकाळ सेवन केल्याने मधुमेह होऊ शकतो आणि हा डायबिटीस लवकर कमी होत नाही. एकदा डायबिटीस झाला की तुम्ही त्यातून लवकर बाहेर पडणं अशक्य आहे आणि त्यामुळेच कॅन्ड अथवा पॅकेज्ड आणि बाटलीतील पदार्थ खाणे टाळा असा सल्ला सद्गुरूंनी दिली आहे.
हाय LDL कोलेस्ट्रॉलचा त्रास
अधिक प्रमाणात होऊ शकतो कोलेस्ट्रॉलचा त्रास
कॅनमध्ये बंद असणारे पदार्थ आणि पॅकबंद पदार्थांमध्ये अतिरिक्त चरबी असू शकते. ही बहुतेकदा सॅच्युरेटेड फॅट स्वरूपात असते, जी शरीरासाठी सर्वात घाणेरडी मानली जाते. या सॅच्युरेटेड चरबीमुळे रक्तातील एलडीएल कोलेस्टेरॉल वाढते जे नसांमध्ये जमा होऊन हृदयविकार होण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे सहसा हे पदार्थ खाणे टाळणे तुमच्या आरोग्यासाठी हितकारक ठरते
निरोगी आरोग्याची 6 सूत्रं, दीर्घायुष्यासाठी Jaggi Vasudev यांनी सांगितले सिक्रेट
हाय ब्लड प्रेशरचा धोका
Canned Food मुळे हाय ब्लड प्रेशरचादेखील होऊ शकतो त्रास
पॅकबंद खाद्यपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात सोडियम असू शकते. हे उच्च रक्तदाबाचे मुख्य कारण मानले जाते. जे हृदयरोगांच्या विकासात भूमिका बजावू शकते आणि त्यामुळेच जे लोक अधिक कॅन्ड अथवा पॅकेज्ड पदार्थ खातात, त्यांना कमी वयातच हृदयविकाराचा त्रास उद्भवत असलेला आपल्याला दिसून येतो. याशिवाय ब्लड प्रेशर लहान वयातच त्यांना जडते आणि त्याचा संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम होत असलेला जाणवतो.
जग्गी वासुदेवांनी सांगितले कारण