गोकुळाष्टमीच्या दिवशी नैवेद्यातील पदार्थांमध्ये बनवा मनमोहक पारंपरिक मोहनथाळ
श्रावण महिन्यातील सगळ्यांच्या आवडीचा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला गोड पदार्थांचा नैवेद्य घरी बनवला जातो. सणावाराच्या दिवशी घरात अनेक गोड पदार्थ बनवले जातात. त्यातील अतिशय आवडीने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे मोहनथाळ. मोहनथाळ हा अतिशय पारंपरिक पदार्थ आहे. बेसन आणि साखरेचा वापर करून बनवलेले पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. गोकुळाष्टमीच्या दिवशी घरात पारंपरिक पद्धतीने बनवलेले पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. गोकुळाष्टमीच्या दिवशी घरात सगळीकडे आनंदी आणि उत्साहाचे वातावरण असते. श्रीकृष्णाचा जन्मदिवस देशभरात सगळीकडे उत्साह आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीमध्ये मोहनथाळ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सणावाराच्या दिवशी कायमच बाजारातून विकत आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरात बनवलेले पदार्थ खावेत. जाणून घ्या मोहनथाळ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट मलई पराठा, १० मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ