फोटो सौजन्य- pinterest
दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीला भक्त पूर्ण भक्तिभावाने श्रीकृष्णाची पूजा केली जाते. यंदा जन्माष्टमीचा सण शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा केला जाणार आहे. या दिवशी घरामध्ये पूजा, उपवास आणि टेबल सजवण्याचे एक वेगळेच वातावरण असते. जन्माष्टमीच्या दिवशी घरात मोरपंख ठेवणे खूप फायदेशीर मानले जाते. मोराचे पंख केवळ भगवान श्रीकृष्णालाच प्रिय नाही तर वास्तु आणि सकारात्मक उर्जेच्या दृष्टिकोनातून देखील खूप प्रभावी मानले जाते. ते घरात ठेवल्याने घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच घरामध्ये हे पंख ठेवल्याने सुख आणि शांती मिळते. जन्माष्टमीला मोरपंख घरात ठेवण्याचे काय आहेत फायदे आणि उपाय, जाणून घ्या
घरातील कोणत्याही दिशेबाबत वास्तुदोष असल्यास स्वयंपाकघर किंवा बाथरूम चुकीच्या दिशेने बांधलेले असेल, तर त्या भिंतीवर मोरपंख लावणे फायदेशीर ठरते. यामुळे त्या ठिकाणाची नकारात्मकता हळूहळू कमी होते आणि सकारात्मक भावना वाढतात.
घराच्या मुख्यदाराच्या वर किंवा बाजूला मोरपंख ठेवल्याने बाहेरून येणाऱ्या नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. तसेच घरातील वातावरणात शांतता राखली जाते. विशेषतः ज्या घरांमध्ये वारंवार भांडणे होतात, तिथे त्याचा परिणाम लवकर दिसून येतो.
जर मुलांना किंवा मोठ्यांना भयानक स्वप्ने पडत असल्यास उशीखाली किंवा डोक्याच्या रेस्टजवळ मोरपंख ठेवा. यामुळे चांगली झोप येते आणि भयानक स्वप्ने टाळता येतात. मन देखील शांत राहते.
जर पती पत्नीमध्ये वारंवार भांडण होत असतील तर बेडरूममध्ये मोरपंख ठेवणे फायदेशीर ठरेल. यामुळे परस्पर समजूतदारपणा वाढतो आणि प्रेम टिकून राहते. यामुळे वैवाहिक जीवनात सुसंवाद येतो.
जर तुम्हाला वारंवार पैशांची कमतरता जाणवत असेल तर तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या जागी मोरपंख ठेवा. हा उपाय केल्याने हळूहळू उत्पन्न वाढविण्यास मदत होते. तसेच तुमची आर्थिक स्थिती सुधारु शकते.
ज्या ठिकाणी मुलं अभ्यास करायला बसतात किंवा अभ्यासाची खोली त्यात ईशान्य दिशेला मोरपंख ठेवा त्यामुळे मुलांमधील एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते. ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करतात आणि परीक्षेत चांगली कामगिरी करतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)