फुफ्फुसांमध्ये पाणी झाल्यानंतर पुढील लक्षणे जाणवतात
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी अनेक लोक आहारात सातत्याने बदल करतात. तसेच आहार तज्ज्ञांचे सल्ले घेतात. पण हे सल्ले काही दिवस फॉलो केल्यानंतर पुन्हा एकदा बाहेरच्या पदार्थांचे सेवन करणे, सतत तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे इत्यादी चुकीच्या गोष्टी फॉलो केल्या जातात. अनेकदा शरीरात जाणवू लागलेल्या बदलांकडे दुर्लक्ष केल्यानंतर छोटे आजार मोठे होण्याची शक्यता असते. अशावेळी आरोग्याची योग्य तो काळजी घेणे गरजेचे आहे. शरीरातील फुफुसांचे आरोग्य बिघडल्यानंतर आरोग्यसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. फुफुसांमध्ये पाणी होण्यास पल्मोनरी एडीमा असे बोलले जाते. हा आजार झाल्यानंतर शरीरात ऑक्सिजनची कमतरता जाणवण्यास सुरुवात होते. या आजारामध्ये हृदयाच्या स्नायूंना रक्त पंप व्यवस्थित होत नाही. यामुळे फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांवर जास्त दाब पडतो आणि फुफ्फुसाना पुरेशी हवा मिळत नाही.
फुफ्फुसांमध्ये पाणी होण्यामागे अनेक कारण आहेत. बीपी, हृदयविकाराचा झटका आणि न्यूमोनिया यांसारखे आजार झाल्यानंतर फुफ्फुसांमध्ये पाणी होण्याची शक्यता असते. या आजारांचा परिणाम फुफ्फुसांवर लगेच होतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेऊन निरोगी जीवन जगले पाहिजे. रक्तातील कार्बन डायऑक्साइड काढून टाकण्यासाठी आणि ऑक्सिजनच्या परिसंचरणासाठी फुफ्फुस महत्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला फुफ्फुसांमध्ये पाणी भरल्यानंतर कोणती लक्षणे जाणवतात, याबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: वाढलेले वजन कमी करण्यासाठी दह्यापासून बनवा ‘हे’ पदार्थ, वजनात होईल झपाट्याने घट
हे देखील वाचा: फास्ट फूड आणि जंक फूडमधील अंतर काय?
फुफ्फुसांमध्ये पाणी झाल्यानंतर पुढील लक्षणे जाणवतात
फुफ्फुसांचे आरोग्य बिघडल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. निरोगी फुफ्फुसांसाठी आहारात आल्याच्या चहाचे सेवन करावे. आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. तसेच आल्यातील गुणधर्म शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्याचे काम करतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी तुम्ही आल्याच्या चहाचे सेवन करू शकता. तसेच फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही आहारात हळदीचे सेवन सुद्धा करू शकता. हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन फुफ्फुसातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी मदत करतात.