शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा 'ही' सवय
कायमच निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी शरीराची खूप जास्त काळजी घेतली जाते. पोषक आहार, व्यायाम, ध्यान, पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण चुकीच्या पद्धतीने डाएट फॉलो केल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात होणाऱ्या बदलांकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. दैनंदिन आयुष्यात केलेल्या छोट्या मोठ्या चुका संपूर्ण आरोग्य बिघडून जातात. त्यातील अत्यंत धोकादायक सवय म्हणजे जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे किंवा जेवणानंतर लगेच झोपणे. आपल्यातील अनेकांना जेवल्यानंतर भरपूर पाणी पिण्याची सवय असते. यामुळे पोट भरलेले राहते, पण आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवल्यानंतर लगेच झोपू नये.(फोटो सौजन्य – istock)
जेवल्यानंतर लगेच झोपण्याऐवजी २० मिनिटं चालणे आवश्यक आहे. चालल्यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतात. यामुळे वजन सहज कमी होते. याशिवाय शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात. जेवल्यानंतर नियमित २० मिनिटं चालल्यास तुम्हाला कधीच औषधं, सप्लिमेंट्स खाण्याची आवश्यकता भासणार नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जेवल्यानंतर नियमित चालल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
रक्तात वाढलेली साखर नियमित ठेवण्यासाठी आहारात कमी गोड पदार्थांचे सेवन केले जाते. रक्तात वाढलेली साखर आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे जेवणानंतर नियमित चालल्यास मधुमेहाचा धोका २० टक्क्यांनी कमी होऊन जातो. याशिवाय आरोग्यासंबंधित गंभीर आजारांपासून शरीराची सुटका होते. मधुमेह झाल्यानंतर चुकीच्या सवयी फॉलो न करता योग्य सवयी फॉलो करणे आवश्यक आहे.
रोजच्या आहारात सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडून जाते,ज्यामुळे ऍसिडिटी, गॅस किंवा अपचनाच्या समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. तसेच जेवणानंतर नियमित २० मिनिटं चालल्यास खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते.
एका स्माईलने आरोग्यही सुधारते! एक नाही अनेक फायदे, हसत चला!
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक तासनतास व्यायाम करतात. तसेच कमी अन्नपदार्थांचे सेवन केले जाते. यामुळे शरीरावर वाढलेले वजन कमी होण्याऐवजी शरीरावर अनेक गंभीर परिणाम होतात. शरीरात अशक्तपणा वाढून खूप जास्त थकवा जाणवतो. त्यामुळे जेवणानंतर नियमित २० मिनिटं चालल्यास शरीराचे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल. याशिवाय महिनाभरात शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील.
जेवणानंतर टाळण्यासारख्या गोष्टी:
जेवणानंतर लगेच झोपल्याने अन्न पचायला जड जाते आणि गॅस, ऍसिडिटी जेवणानंतर लगेच जड व्यायाम केल्याने पचनक्रियेवर ताण येतो आणि अपचन होऊ शकते.वजनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
जेवणानंतर करण्यासारख्या चांगल्या सवयी:
जेवणानंतर थोडे चालल्याने अन्न पचण्यास मदत होते आणि पचनसंस्था सुधारते. जेवणानंतर लगेच फळे खाल्ल्याने पचनास मदत होते आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात.