वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. जगभरातील अनेक लोक वाढलेल्या वजनाने त्रस्त आहेत. सतत बाहेरचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रियेत बदल होते. पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. यामुळे पोटावर आणि शरीराच्या इतर भागांवर अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात होते. जमा झालेली चरबी आरोग्यसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे योग्य पद्धतीचा वापर करून तुम्ही वाढलेले वजन कमी करु शकता. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करताना दह्यापासून बनवलेले कोणते पदार्थ वजन कमी करण्यासाठी गुणकारी ठरतील, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
वाढलेले वजन कमी करण्यासाठी दह्यापासून बनवा 'हे' पदार्थ
काळीमिरी पावडर आणि दही मिक्स करून खाल्ल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. शरीरावरील चरबी जाळून टाकण्यासाठी दही, काळीमिरी मदत करते. तसेच या मिश्रणाचे तुम्ही आहारात सेवन करू शकता.
शरीराला थंडावा देण्यासाठी आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ताक मदत करते. ताक तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकता. ताकामध्ये असलेले लॅक्टिक ऍसिड पचन सुधारते आणि शरीरातील चरबी कमी करण्यासाठी मदत करतात.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं दही भात खायला खूप आवडतो. घरी भाजी किंवा डाळ नसेल तेव्हा अनेक लोक दही भाताचे सेवन करतात. वजन कमी करण्यासाठी दही भात गुणकारी आहे.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही दही स्मूदी बनवू शकता. दह्यापासून स्मूदी बनवता येते. वेगवेगळी फळे किंवा भाज्या वापरून तुम्ही दह्याची स्मूदी बनवू शकता. सफरचंद, केळी आणि द्राक्षे यांसारखी फळे शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करतात. तसेच यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर आढळून येते.
मीठ किंवा साखर टाकून दह्याचे सेवन करण्याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट टाकून दही खाऊ शकता. ड्रायफूट आरोग्यासाठी गुणकारी आहेत. ड्रायफ्रूटचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. तसेच सकाळी उठल्यानंतर नाश्त्यामध्ये दही ड्रायफ्रूट खाल्ल्यास लवकर भूक लागणार नाही.