पाठ दुखीपासून आराम मिळवण्यासाठी ही आसन नियमित करा
सतत ऑफिसमध्ये बसून लॅपटॉप आणि मोबाईलवर काम करत राहिल्यामुळे पाठीचा कणा दुखण्यास हळूहळू सुरुवात होते. पाठीचा कणा दुखू लागल्यानंतर पाठीमध्ये असह्य वेदना होण्यास सुरुवात होते. त्यामुळे काम करताना किंवा इतर वेळी खाली बसताना ताठ पाठ करून बसावे. जेणेकरून पाठ दुखणार नाही. तासनतास एका जागेवर बसून काम करत राहिल्यामुळे पाठीच्या कणांच्या नसा पूर्णपणे आखडून जातात.ज्याला किफोसिस म्हणतात. यामुळे बसताना किंवा उठताना खूप त्रास सहन करावा लागतो. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्याने गोळ्या औषध घ्यावीत. अन्यथा पाठीचे दुखणे वाढल्यानंतर आरोग्य हळूहळू बिघडू लागते. आज आम्ही तुम्हाला पाठीच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी कोणती योगासने करावीत, याबद्दल सांगणार आहोत. ही आसन केल्यामुळे पाठीत दुखणे थांबेल.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: 30 मिनिटे चालणे ठेवते अनेक आजारांना दूर, जाणून घ्या रोज चालण्याचे फायदे
पाठीच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी नियमित बालासना करावे. हे आसन केल्यामुळे पाठीचे दुखणे थांबते. हे आसन करताना सगळ्यात आधी वज्रासनात बसा आणि मनगट खांद्याच्या खाली ठेवा. त्यानंतर कपाळ जमिनीवर ठेवून हात समोर ठेवा. यामुळे खांद्यावर आणि पाठीच्या मणक्यावर ताण येईल. या स्थितीमध्ये 1 ते 2 मिनिटं बसल्यानंतर नॉमल स्थितीमध्ये यावे. बालासना नियमित केल्यास पाठीचे दुखणे थांबेल.
नियमित भुजंगासन केल्यास पाठीचे दुखणे थांबेल. पाठीमधील वेदना कमी होतील. भुजंगासन करताना सगळ्यात आधी पोटावर झोपा आणि हात खांद्यावर आणि मनगट खांद्याच्या खाली ठेवा. नंतर कपाळ जमिनीवर ठेवून हात समोर आणा. हे आसन कमीत कमी एक ते दोन मिनिटं केल्यानंतर नॉर्मल स्थितीमध्ये यावे.
काऊ-कॅट पोझ करताना पाठ सरळ ठेवा. नंतर मनगट खांद्याच्या खाली ठेवा. नंतर श्वास घेऊन पाठ कमान करा आणि जमिनीच्या दिशेने खाली करा आणि डोकं वर करा. नंतर पाठीचा मणका गोलाकार फिरवताना श्वास सोडा आणि हनुवटी छातीवर टेकवा. नाभी तुमच्या मणक्याकडे खेचा आणि गुडघ्यांवर बसा.
हे देखील वाचा: PCOS झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे? वेळीच लक्ष देऊन घ्या आरोग्याची काळजी
पाठीच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी शलभासन आसन नियमित करा. हे आसन करताना सगळ्यात आधी जमिनीवर पोटावर झोपा. त्यानंतर तळवे मांड्यांच्या खाली ठेवा आणि डोके, मान आणि तोंड सरळ ठेवून दीर्घ श्वास घ्या. त्यावेळी दोन्ही पाय वर उचलण्याचा प्रयत्न करा. या स्थितीमध्ये काही वेळ राहिल्यानंतर पायांना खाली ताण द्या.