सकाळी उठल्यानंतरर उपाशी पोटी आंबट फळांचा रस प्यावा की नाही?
सकाळी उठल्यानंतर काहींना चहा, कॉफी पिण्याची सवय असते. तर काहींना डिटॉक्स पेयांचे सेवन करण्याची सवय असते.सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे या वेळेत कायमच शरीरास हानी न पोहोचवणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. बऱ्याचदा अनेक लोक सकाळी उठल्यानंतर आंबट फळांच्या रसाचे सेवन करतात. संत्री, आवळा, मोसंबी इत्यादी आंबट फळांच्या रसाचे किंवा आंबट फळांचे नियमित सेवन केले जाते. पण उपाशी पोटी आंबट फळांचा रस प्यायल्यास शरीराचे गंभीर नुकसान होईल. आंबट फळांमध्ये मोठ्या प्रमाणावर सायट्रिक अॅसिड आढळून येते, जे उपाशी पोटी खाणे योग्य नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आंबट फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्यावर नेमके कोणते दुष्परिणाम होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
उपाशी पोटी आंबट फळांचा रस प्यायल्यामुळे शरीरात जळजळ वाढणे, छातीमध्ये जळजळ वाढणे, आंबट ढेकर येणे, मळमळ, उलट्या किंवा अॅसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे उपाशी पोटी कोणत्याही आंबट फळांचे सेवन अजिबात करू नये. पोटात वाढलेल्या अॅसिडिटीमुळे छातीमध्ये अस्वस्थ वाटू लागते, याशिवाय आम्ल्पित्त वाढून अपचन होते.
आंबट फळांच्या सेवनामुळे पोटात अॅसिडिटी झपाट्याने वाढू लागते. वारंवार अॅसिडिटी होत असल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.अॅसिडिटी वाढल्यामुळे गॅस्ट्रायटिसचा धोका वाढतो. त्यामुळे उपाशी पोटी ऍसिडिटी वाढवणाऱ्या फळांचे अजिबात सेवन करू नये. तसेच उपाशी पोटी फळांचा रस प्यायल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते, ज्यामुळे मधुमेह होतो.
उपाशी पोटी आंबट फळांच्या सेवनामुळे दातांवर चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. फळांमध्ये असलेल्या ऍसिडमध्ये दातांचा वरील थर खराब होऊन जातो आणि दात कमकुवत होतात. यामुळे दातांना लवकर कीड लागणे किंवा झिणझिण्या येण्याची शक्यता वाढते.
फळांचे सेवन कायमच जेवणानंतर किंवा जेवताना प्यावे. यामुळे पोटातील ऍसिडिटीचे प्रमाण कमी होते आणि छातीमध्ये जळजळ होत नाही. तसेच उपाशी पोटी तुम्ही लिंबू पाण्याचे किंवा जिऱ्याचा पाण्याचे सेवन करावे. गॅस्ट्रायटिस किंवा अॅसिड रिफ्लक्ससारख्या गंभीर समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात कायमच गरम पाण्याचे सेवन करावे.
फळांचे रस पिण्याचे दुष्परिणाम?
फळांच्या रसात ऍसिड असते, ज्यामुळे काही लोकांना ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो.फळांच्या रसात साखर जास्त असल्याने, ते प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, ज्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरू शकते.
फळांचे रस पिताना काय काळजी घ्यावी?
फळांचे रस कमी प्रमाणात प्यावे.जास्त साखर असलेले रस टाळावे.जेवल्यानंतर किंवा नाश्त्यासोबत रस प्यावा.दात घासण्यापूर्वी किंवा नंतर रस पिणे टाळावे.