Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजार समजून घेण्याची नवी वाट! केईएम रुग्णालयाचे ६७ रुग्णशिक्षणपट, जनजागृतीचा अभिनव शताब्दी उपक्रम

मुंबईतील सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम रुग्णालयाने शताब्दी वर्षानिमित्त एक अभिनव आणि समाजोपयोगी उपक्रम राबवला आहे. विविध सामान्य आजारांवर आधारित ६७ रुग्णशिक्षण लघुपटांची निर्मिती कारण्यात आली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 04, 2026 | 12:58 PM
आजार समजून घेण्याची नवी वाट! केईएम रुग्णालयाचे ६७ रुग्णशिक्षणपट, जनजागृतीचा अभिनव शताब्दी उपक्रम

आजार समजून घेण्याची नवी वाट! केईएम रुग्णालयाचे ६७ रुग्णशिक्षणपट, जनजागृतीचा अभिनव शताब्दी उपक्रम

Follow Us
Close
Follow Us:

राम खांदारे: पांढऱ्या कोटांतले डॉक्टर, हातात फाईल्सऐवजी पटकथा, वॉर्ड, ओपीडी आणि कॉरिडॉरमध्ये रुग्णांची गर्दी जशीच्या तशी, पण त्याच जागी थोड्याच वेळात कॅमेऱ्याचा फ्रेम, लाईट्स आणि “ऍक्शन”चा आवाज घुमतोय. हे एखाद्या चित्रपटाचं सेटअप वाटेल, पण हे दृश्य आहे केईएम रुग्णालयाच्या प्रत्यक्ष कामकाजाचं. जिथे उपचारांबरोबरच जनजागृतीचीही तितकीच गंभीर तयारी सुरू आहे. आजारावर उपचार होण्याआधी आजार समजणं गरजेचं असतं. हीच संकल्पना प्रत्यक्षात उतरवत मुंबईतील सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम रुग्णालयाने शताब्दी वर्षानिमित्त एक अभिनव आणि समाजोपयोगी उपक्रम राबवला आहे. विविध सामान्य आजारांवर आधारित ६७ रुग्णशिक्षण लघुपटांची निर्मिती करून केईएमने आरोग्य जनजागृतीच्या क्षेत्रात नवा मापदंड निर्माण केला आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

गर्भलिंगनिदान रोखण्यासाठी डिकॉय ऑपरेशन! ९९ टक्क्यांहून अधिक सोनोग्राफी केंद्राची तपासणी

यात न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी, स्त्रीरोग, बालरोग, शस्त्रक्रिया, त्वचारोग, नेत्ररोग, फिजिओथेरपी, ईएनटी, नेफ्रोलॉजी, युरोलॉजी अशा १७ विभागांतील आजारांवर आधारित हे लघुपट सर्वसामान्य रुग्णांना सोप्या भाषेत आजाराची लक्षणं, तपासण्या, उपचार आणि बरे होण्याचा प्रवास समजावून सांगतात. प्रत्येक चित्रपटात रुग्णाची तक्रार घेऊन रुग्णालयात येण्यापासून सुरू होणारा प्रवास दाखवण्यात आला आहे. ओपीडी किंवा आयपीडीतील उपचार प्रक्रिया, आवश्यक तपासण्या, उपचारपद्धती आणि शेवटी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अशा संपूर्ण उपचार साखळीचे वास्तवदर्शी चित्रण या चित्रपटांत आहे. विशेष म्हणजे हे सर्व चित्रपट हिंदी भाषेत तयार करण्यात आले असून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश आहे.

वैशिष्ट्य:

या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व कलाकार केईएम रुग्णालयातीलच डॉक्टर, विद्यार्थी, परिचारिका, तंत्रज्ञ आणि कर्मचारी आहेत, तर चित्रीकरण संपूर्णपणे केईएम कॅम्पसमध्येच झाले आहे. सर्व चित्रपटांच्या पटकथा केईएमच्या डॉक्टरांनीच लिहिल्या असून, या उपक्रमासाठी प्रसिद्ध चित्रपटकार सुभाष घई यांच्या ‘व्हिसलिंग वुड्स’ संस्थेचे सहकार्य लाभले आहे. हे चित्रपट केईएम रुग्णालयाच्या यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि अधिकृत वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आले असून, रुग्णालयातील विविध ओपीडी वेटिंग एरियामधील टीव्हींवरही सतत दाखवले जात आहेत. रुग्णांना प्रतीक्षेच्या वेळेतच आजाराविषयी माहिती मिळावी, हा त्यामागचा हेतू आहे. याशिवाय, प्रत्येक चित्रपटासाठी क्यूआर कोड तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, रुग्णालयाबाहेर असतानाही रुग्ण हे चित्रपट पाहू शकणार आहेत.

हा उपक्रम अरुणा अडवाणी यांच्या देणगीतून साकार झाला असून, या संकल्पनेला केईएमच्या डीन डॉ. संगीता रावत यांचे सतत मार्गदर्शन आणि पाठबळ लाभले. व्हिसलिंग वुड्सचे दिग्दर्शक विशाल मंगलोरकर आणि अनुराधा यांच्या सर्जनशील योगदानामुळे हे चित्रपट अधिक प्रभावी झाले आहेत.रुग्ण, नातेवाईक आणि समाजाला आजारांविषयी योग्य माहिती देऊन भीती कमी करणे, उपचारांवरील विश्वास वाढवणे आणि आरोग्यविषयक सजगता निर्माण करणे या दृष्टीने केईएम रुग्णालयाचा हा शताब्दी उपक्रम निश्चितच समाजासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

World Cancer Day 2026: डोळ्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास गमवावी लागेल दृष्टी

“केईएम रुग्णालयाला १०० वर्षे पूर्ण झाली असून या शताब्दी वर्षात अशा १०० रुग्णशिक्षणपटांची निर्मिती करण्याचा आमचा संकल्प आहे. आजार, प्रतिबंधात्मक उपाय आणि घ्यावयाची काळजी हे सर्व या लघु फिल्म्स मधून मांडण्यात आले आहे. कुठेही घाबरून न जाता, धीराने आणि योग्य माहितीच्या आधारे आजारांना सामोरे जाण्याचा संदेश प्रत्येक फिल्म्स देतात.डॉ. संगीता रावत, अधिष्ठात्री, केईएम रुग्णालय, यांनी मत स्पष्ट केले आहे.

Web Title: A new way to understand the disease 67 patient education films of kem hospital innovative centenary awareness campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • Doctor advice
  • health issue
  • KEM HOSPITAL

संबंधित बातम्या

Health Care Tips: किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींनी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ! पोटात वाढतील असह्य वेदना
1

Health Care Tips: किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींनी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ! पोटात वाढतील असह्य वेदना

पायांवर दिसून येणाऱ्या ‘या’ रेघांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! शरीरसंबंधित उद्भवेल गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या सविस्तर
2

पायांवर दिसून येणाऱ्या ‘या’ रेघांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! शरीरसंबंधित उद्भवेल गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या सविस्तर

सॅलड आणि फळांवर मीठ टाकून खात असाल तर थांबा! किडनीच्या आरोग्याला पोहचू शकतो धोका
3

सॅलड आणि फळांवर मीठ टाकून खात असाल तर थांबा! किडनीच्या आरोग्याला पोहचू शकतो धोका

सुरक्षित महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबवा! जिल्हाधिकारी मीना यांचे निर्देश; जिल्ह्यात कुष्ठरोग जनजागृती मोहीम
4

सुरक्षित महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबवा! जिल्हाधिकारी मीना यांचे निर्देश; जिल्ह्यात कुष्ठरोग जनजागृती मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.