योगासने करण्याआधी अंघोळ करावी की नंतर?
जगभरात सगळीकडे २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. नियमित योगासने केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शरीर कायमच निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी ध्यान आणि योगासने करावीत. धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीरात वाढलेला तणाव दूर करण्यासाठी योगासने केली जाते. योगासने केल्यामुळे शरीरसोबतच मन, भावना आणि आत्मा सुद्धा बळकट राहतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी नियमित योगासने करावीत. प्राणायाम, योगासन आणि ध्यान केल्यामुळे मानसिक आरोग्यासोबतच शारीरिक आरोग्य सुद्धा निरोगी राहते. योगासने केल्यामुळे हृदय, मेंदू, फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंडइत्यादी निरोगी ठेवण्यासाठी योगासने करावीत.(फोटो सौजन्य – istock)
शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील संतुलन राखण्यासाठी योग करण्याचा सल्ला दिला जातो. मधुमेह, दमा, हृदयविकाराचा झटका, नैराश्य आणि इतर अनेक गंभीर आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी योगासने करावीत. मात्र योगासने करण्याआधी अंघोळ करावी किंवा योगासने करून झाल्यानंतर अंघोळ करावी? असे अनेक प्रश्न तुम्हाला सुद्धा पडले असतील ना. चला तर जाणून घेऊया प्रेमानंद महाराजांनी दिलेले उत्तर आणि योगासने केल्यामुळे शरीराला होणारे गुणकारी फायदे.
चुकीच्या पद्धतीने योगासने केल्यास शरीराला फायदे होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. आपल्यातील अनेकांना योगासने करण्याची योग्य वेळ माहित नसते. चुकीच्या पद्धतीने केलेला योगा शरीरावर नकारात्मक परिणाम करतो. अंघोळ केल्यानंतर किंवा अंघोळ करण्याआधी योगासने करावीत का? असा प्रश्न तुम्हाला पण कधीना कधी पडला असेल. अंघोळ केल्यानंतर तुम्ही योगासने करू शकता.
आपल्यातील अनेकांना योग करण्याची योग्य पद्धत माहित नसते. योगासने करताना घाम येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे अनेकांना योगासने केल्यानंतर अंघोळ करायला आवडते. योगासने केल्यानंतर अंघोळ केल्यास घामामुळे भिजलेले शरीर स्वच्छ होते आणि त्वचा कायमच निरोगी राहते. योगासने किंवा ध्यान केल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण वाढू लागते. मेंदूपासून पायांपर्यंत जाऊन ते ऑक्सिजन संपूर्ण शरीरापर्यंत पोहचवते. पण अंघोळ केल्यानंतर रक्ताभिसरण विस्कळीत होण्याची जास्त शक्यता असते. यामुळे फायदे नाहीतर उलट, रक्तप्रवाह कमी होण्याची समस्या उद्भवते.