Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रावणी सोमवार स्पेशल : उपवास आहे तर घरी बनवा गोडसर अन् सर्वांच्या आवडीची साबुदाण्याची खीर, चवीसह पचायलाही आहे हलकी

Sabudana Kheer Recipe : यंदाच्या श्रावणी सोमवारी घरी बनवा गोड आणि पोटभरणीची साबुदाणा खीर! उपवासाला खास करून साबुदाण्याची खीर तयार केली जाते, जी चवीला अप्रतिम लागते आणि झटपट तयारही होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 17, 2025 | 01:05 PM
श्रावणी सोमवार स्पेशल : उपवास आहे तर घरी बनवा गोडसर अन् सर्वांच्या आवडीची साबुदाण्याची खीर, चवीसह पचायलाही आहे हलकी

श्रावणी सोमवार स्पेशल : उपवास आहे तर घरी बनवा गोडसर अन् सर्वांच्या आवडीची साबुदाण्याची खीर, चवीसह पचायलाही आहे हलकी

Follow Us
Close
Follow Us:

श्रावण महिना सुरु झाला आहे, हा महिना भगवान शिवाला समर्पित असून अनेकजण याकाळात उपवास ठेवतात. हिंदू धर्मात श्रावणी सोमवारला फार महत्त्व असून यादिवशी भगवान शिवाला गोड पदार्थ समर्पित केला जातो. तुम्हीही श्रावणी सोमवारचा उपवास पकडत असाल तर आजची ही रेसिपी तुमच्या फायद्याची ठरणार आहे. आज आम्ही तुमच्यासाठी साबुदाणा खीरची एक सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी घेऊन आलो आहोत.

पावसाच्या थंड वातावरणात घरी नक्की बनवा चायनीज स्टाईल गरमा गरम मंचाव सूप; चवीसह पौष्टिकतेचा संगम!

भारतीय मिठाईंमध्ये खीर हा नेहमीच लोकप्रिय गोड पदार्थ मानला जातो. तांदळाची खीर, शेवयांची खीर तर सर्वांना ठाऊकच आहे, पण साबुदाण्याची खीर ही खास करून उपवासाच्या दिवशी खाल्ली जाते. ही खीर हलकी, पचायला सोपी आणि पौष्टिक असते. दूध, साबुदाणा, साखर आणि सुगंधी वेलदोड्याच्या मिश्रणामुळे तयार होणारी ही खीर उपवासात गोडाचा आनंद घेण्यासाठी उत्तम पर्याय आहे. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • साबुदाणा – ½ कप
  • दूध – ½ लिटर
  • साखर – ½ कप (चवीनुसार कमी-जास्त)
  • वेलदोडा पावडर – ½ टीस्पून
  • काजू, बदाम, मनुका – 2 टेबलस्पून (चिरलेले)
  • तूप – 1 टीस्पून

कृती

  • यासाठी सर्वप्रथम साबुदाणा धुऊन 2-3 तास पाण्यात भिजत ठेवा.
  • एका पॅनमध्ये दूध उकळायला ठेवा.
  • दूधाला उकळी आल्यावर त्यात भिजवलेला साबुदाणा घाला.
  • मंद आचेवर हालवत शिजू द्या. साबुदाणा पारदर्शक दिसू लागला की तो शिजल्याचे समजावे.
  • आता त्यात साखर घालून छान हलवा.
  • वेगळ्या पॅनमध्ये थोडे तूप गरम करून काजू-बदाम हलके परतून घ्या व खिरीत घाला.
  • शेवटी वेलदोडा पावडर टाकून खीर सुगंधी बनवा.
  • गरमागरम खीर तशीच खाऊ शकता किंवा थंड करून देखील सर्व्ह करता येते
  • उपवासात ही खीर पौष्टिक, हलकी व गोड खाण्याची उत्तम मेजवानी ठरते.

रविवार होईल आणखीनच मस्त! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चपाती पिझ्झा, नोट करून घ्या रेसिपी

FAQs (संबंधित प्रश्न)

साबुदाण्याची खीर उपवासासाठी योग्य आहे का?
हो, साबुदाण्याची खीर उपवासाच्या दिवसांमध्ये खाण्यासाठी योग्य आहे.

साबुदाण्याची खीर पौष्टिक आहे का?
हो, साबुदाण्याची खीर पौष्टिक आहे कारण त्यात कार्बोहायड्रेट्स आणि कॅल्शियम असते.

Web Title: Shravan 2025 special make tasty and sweet sago kheer at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 01:05 PM

Topics:  

  • marathi recipe
  • Shravan 2025
  • sweet dish

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या थाळीत करा या पारंपरिक पदार्थाचा समावेश; जाणून घ्या खुसखुशीत चिरोट्यांची रेसिपी
1

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या थाळीत करा या पारंपरिक पदार्थाचा समावेश; जाणून घ्या खुसखुशीत चिरोट्यांची रेसिपी

राजस्थानचा चविष्ट आणि अनोखा स्ट्रीट फूड ‘कांजी वडे’ कधी खाल्ले आहेत का? चटाकेदार चवीने भरलेला हा पदार्थ एकदा घरी बनवाच!
2

राजस्थानचा चविष्ट आणि अनोखा स्ट्रीट फूड ‘कांजी वडे’ कधी खाल्ले आहेत का? चटाकेदार चवीने भरलेला हा पदार्थ एकदा घरी बनवाच!

Ganesh Chaturthi 2025 : पदार्थाला द्या हटके टच, यंदा ओरिओ बिस्किटांपासून बनवा चविष्ट मोदक
3

Ganesh Chaturthi 2025 : पदार्थाला द्या हटके टच, यंदा ओरिओ बिस्किटांपासून बनवा चविष्ट मोदक

जेवणासाठीचा मसालेदार मेन्यू! घरी बनवून तर पहा पंजाबी स्टाईल चमचमीत छोले भटुरे
4

जेवणासाठीचा मसालेदार मेन्यू! घरी बनवून तर पहा पंजाबी स्टाईल चमचमीत छोले भटुरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.