Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramdan Special : इफ्तार पार्टीला घरी बनवा गोड ‘खजुराची खीर’, मेजवानीची चव करेल दुप्पट

Dates Kheer Recipe : ही इफ्तार स्पेशल खजूर खीर चविष्ट, पौष्टिक आणि पारंपरिक चवीची उत्तम सांगड घालणारी आहे. इफ्तार पार्टीत हा गोड पदार्थ नक्की करून पाहा आणि आपल्या कुटुंबियांसोबत रमजानचा आनंद अधिक गोड करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 26, 2026 | 09:35 AM
Ramdan Special : इफ्तार पार्टीला घरी बनवा गोड 'खजुराची खीर', मेजवानीची चव करेल दुप्पट

Ramdan Special : इफ्तार पार्टीला घरी बनवा गोड 'खजुराची खीर', मेजवानीची चव करेल दुप्पट

Follow Us
Follow Us:
  • इफ्तारमध्ये खजुराचा आवर्जून समावेश केला जातो.
  • अशात तुम्ही साधे खजूर खाण्याऐवजी घरी खजुराची गोड खीर तयार करू शकता.
  • ही खीर फार झटपट तयार होते आणि याची चव सर्वांनाच खुश करते.
रमजान महिन्यातील इफ्तार म्हणजे दिवसभराच्या उपवासानंतरचा आनंदाचा आणि समाधानाचा क्षण. अजान होताच खजूर खाऊन उपवास सोडण्याची परंपरा आहे. इस्लामिक परंपरेनुसार पैगंबर प्रोफेट मोहम्मद यांनी खजूर खाऊन रोजा सोडण्याची शिकवण दिली आहे, त्यामुळे इफ्तारमध्ये खजूरला विशेष महत्त्व आहे. खजूर हे नैसर्गिक गोड, ऊर्जा देणारे आणि पौष्टिक फळ आहे. त्यामध्ये फायबर, आयर्न, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.

बाहेरून कशाला? मुंबईचा फेमस स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत ‘वडा पाव’ बनवा आता घरीच, रेसिपी आहे फार सोपी

दिवसभर उपवास केल्यानंतर शरीराला झटपट ऊर्जा देण्यासाठी खजूर उत्तम पर्याय ठरतो. म्हणूनच इफ्तार पार्टीसाठी खजूरपासून बनवलेली खीर हा एक परफेक्ट, हेल्दी आणि चविष्ट गोड पदार्थ आहे. ही खजूर खीर साध्या तांदळाच्या खिरीपेक्षा वेगळी आणि अधिक पौष्टिक आहे. साखरेऐवजी खजूर वापरल्यामुळे ती नैसर्गिक गोड लागते आणि चवीलाही छान येते. कुटुंबासोबत किंवा पाहुण्यांसाठी इफ्तार पार्टीमध्ये ही खीर नक्कीच सर्वांना आवडेल. चला नोट करुयात याची सोपी रेसिपी.

साहित्य

  • १ कप बिया काढलेले खजूर (बारीक चिरलेले)
  • १ लिटर दूध
  • २ टेबलस्पून तूप
  • २ टेबलस्पून बारीक शेवई किंवा तांदूळ
  • ४–५ बदाम (कापलेले)
  • ४–५ काजू (चिरलेले)
  • ½ टीस्पून वेलची पूड
  • १ टेबलस्पून मनुका
  • आवश्यक असल्यास थोडी साखर
लो कॅलरी पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा ज्वारी मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या

कृती

  • सर्वप्रथम खजूर कोमट दुधात १०–१५ मिनिटे भिजत ठेवा. नंतर त्याची जाडसर पेस्ट तयार करा.
  • कढईत तूप गरम करून शेवई किंवा तांदूळ हलक्या आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
  • एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध उकळायला ठेवा. उकळी आल्यावर आच मंद करा.
  • उकळत्या दुधात भाजलेली शेवई किंवा तांदूळ घाला आणि शिजू द्या. नंतर खजूराची पेस्ट घालून नीट हलवा.
  • काजू, बदाम आणि मनुका घाला. खीर थोडी घट्ट होईपर्यंत शिजू द्या.
  • वेलची पूड घाला. जर गोड कमी वाटत असेल तर थोडी साखर घालू शकता.
  • गॅस बंद करून खीर थोडी थंड होऊ द्या. गरम किंवा थंड, दोन्ही प्रकारे इफ्तार पार्टीत सर्व्ह करा. वरून ड्रायफ्रूट्सने सजवा.
 

Web Title: Ramdan special make tasty khajur kheer at home for iftar party recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

South Indian Dessert: अस्सल दाक्षिणात्य पद्धतीने बनवा मऊ लुसलुशीत गोड पोंगल, पारंपरिक पदार्थाने वाढेल जेवणाची चव
1

South Indian Dessert: अस्सल दाक्षिणात्य पद्धतीने बनवा मऊ लुसलुशीत गोड पोंगल, पारंपरिक पदार्थाने वाढेल जेवणाची चव

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा गाडीवर मिळते तशी ‘अंडा भुर्जी’, चवीसोबत आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर
2

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा गाडीवर मिळते तशी ‘अंडा भुर्जी’, चवीसोबत आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

प्रत्येक घासात मिळेल हटके टेस्ट! १० मिनिटांमध्ये बनवा व्हायरल कोरियन स्टाइल मॅगी, नोट करून घ्या रेसिपी
3

प्रत्येक घासात मिळेल हटके टेस्ट! १० मिनिटांमध्ये बनवा व्हायरल कोरियन स्टाइल मॅगी, नोट करून घ्या रेसिपी

कांदा-लसूणचा वापर न करता अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा लाल भोपळ्याचे चविष्ट भरीत, पचनासाठी अतिशय हलका पदार्थ
4

कांदा-लसूणचा वापर न करता अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा लाल भोपळ्याचे चविष्ट भरीत, पचनासाठी अतिशय हलका पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.