या व्यक्तींनी चुकूनही करू नका साबुदाण्याचे सेवन
उपवासाच्या दिवशी किंवा इतर वेळी नाश्त्यात अनेकांना साबुदाणा खिचडी किंवा साबुदाण्यांपासून बनवलेले पदार्थ खायला आवडतात. साबुदाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहेत. साबुदाण्यांपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यानंतर पोट लगेच भरते आणि लवकर भूक लागत नाही. साबुदाण्यांपासून साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, खीर, साबुदाणा टिक्की, पापड इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. अनेक लोक आवडीने साबुदाण्यांपासून बनवलेले पदार्थ खातात. मात्र काहींना साबुदाणे खाल्यानंतर असिडिटी किंवा अपचनाचा त्रास होतो. साबुदाणे पचनास जड असतात. साबुदाणे खाल्ल्यानंतर काहींचे आरोग्य सुधारण्याऐवजी आणखीन बिघडून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या व्यक्तींनी साबुदाण्याचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांनी चुकूनही साबुदाण्याचे सेवन करू नये. साबुदाणे खाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. साबुदाण्यांमध्ये असलेल्या कार्बोहायड्रेटमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते. यामुळे आजार कमी होण्याऐवजी आणखीन वाढू लागतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी शक्यतो साबुदाण्याचे सेवन करू नये.
हे देखील वाचा: घरगुती उपाय करूनही पोट स्वच्छ होत नाही? मग सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘ही’ योगासने
अतिप्रमाणात साबुदाण्याचे सेवन केल्यामुळे लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. यामुळे तुमचे वजन वाढू लागते. उपवास केल्यानंतर साबुदाण्याचे सेवन केल्यास उलटा परिणाम होऊ शकतो. तसेच साबुदाण्यांमध्ये कॅलरी आणि कार्बोहायड्रेट जास्त असतात. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो. अतिप्रमाणात साबुदाणे खाल्यामुळे वजन लागेच वाढते.
उपवासाच्या दिवशी साबुदाणे खाल्यामुळे शरीरावर त्याचा उलटा परिणाम दिसून येतो. रिकाम्या पोटी साबुदाणे खाल्यास अपचन आणि असिडिटी होते. साबुदाणे पचनास जड असतात. त्यामुळे उपवासाच्या दिवशी शक्यतो खिचडीचे सेवन करू नये.
हे देखील वाचा: रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करण्याची सवय आहे? सावध व्हा! होतात अनेक दुष्परिणाम
थायरॉईड असलेल्या महिलांनी साबुदाण्याचे सेवन करू नये. यामुळे शरीरातील थायरॉइडची पातळी वाढू शकते. तसेच साबुदाणे खाल्यानंतर वजन लगेच वाढते. त्यामुळे थायरॉईड असलेल्या महिलांनी शक्यतो साबुदाण्याचे सेवन करू नये.