फोटो सौजन्य - Social Media
काही लोकांना झोपण्यागोदर अंघोळ करण्याची सवय असते. अंघोळ करणे कधीही उत्तम, परंतु त्याला काही वेळ काळ असणे महत्वाचे असते. रात्रीच्या वेळी आपले शरीर थकून आपला मेंदू आराम करण्याची आज्ञा देत असतो. आपल्या शरीराचे तापमान थंड होऊन जाते, यामध्ये आपण जर अंघोळ केली तर आपल्या शरीराचे थंड तापमान पुन्हा गरम होते. शरीराच्या गरम झालेल्या तापमानामुळे झोपण्यास त्रास होतो. शरीराला हवा तशा आराम मिळत नाही. परिणामी, आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम दिसून येतो.
हे देखील वाचा : घरातल्या घरात ‘अशाप्रकारे’ चाला 10 हजार स्टेप्स, बाहेर न जाता राहील फिट
आपली कार्यक्षमता बिघडून जाते. बरेच जणांचे असे म्हणणे असते कि अंघोळ केल्यावर लगेच झोपी गेलो तर त्याचा वाईट परिणाम आपल्या मेंदूवर जाणवतो. परिणामी, आपला मेंदू कमजोर होतो. परंतु, या सगळ्या निव्वळ अफवा आहेत. या गोष्टीचे काही प्रमाण नाही आहेत. परंतु, अंघोळ केल्यावर लगेच झोपी गेल्यावर शरीर आणि आरोग्यावर अनेक परिणाम होतात.
अंघोळ केल्यावर लगेच झोपी गेलो कि ओलाव्यामुळे झोपण्याच्या अंथरुणावर बॅक्टेरिया तयार होतात. याने केसातील जडे कमजोर होतात आणि परिणामी, केसाच्या गळतीचा त्रास होतो. तसेच अन्य त्रास होतात. जर झोपण्या गोदर अंघोळ गरम पाण्याने केले जात असेल तर याचा परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर जाणवून येतो. अशाने डोळ्यांमध्ये सुखेपणा जाणवतो, तसेच डोळे लाल होण्याचे प्रमाण वाढते. डोळ्यांमध्ये खाज सुटणे आणि अनेक समस्या उद्भवतात.
हे देखील वाचा : ‘या’ 6 सुपरफूड्समुळे राहील Lungs उत्तम आणि शरीर भरभक्कम, आजच करा आहारात समाविष्ट
रात्री अंघोळ केल्याने झोपेमध्ये बदल जाणवतो. पूर्वीसारखी झोप जाणवत नाही. झोप अपूर्ण राहिल्याने अनेक समस्या निर्माण होतात. याचा परिणाम दिमाखावर होतो आणि डिप्रेशनसारख्या मानसिक विकाराला व्यक्ती बळी जातो. रात्री झोपण्यागोदर अंघोळ केल्याने वजन वाढतो. पुढे याचे स्वरूप लठ्ठपणामध्ये बदल घेते. परिणामी, व्यक्तीला मधुमेह तसेच हृदयविकाराच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. रात्री झोपण्या अगोदर अंघोळ केल्याने मसल्स क्रॅम्प वाढतो. तसेच सांधे दुखी वाढते. परिणामी, व्यक्तीला चालण्यास-फिरण्यास त्रास जाणवतो.