पचनक्रिया सुधरण्यासाठी 'ही' योगासने नियमित करा
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी शरीराची पचनक्रिया निरोगी असणे आवश्यक आहे. काही वेळा सतत बाहेरचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्यामुळे पोट बिघडून जाते. पचनक्रियेत बिघाड झाल्यानंतर काहीवेळा पोट स्वच्छ होत नाही. पोटातील विषारी पदार्थ तसेच साचून राहतात. पोटात साचून राहिलेल्या विषारी पदार्थांमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे रोजच्या शरीराला पचणाऱ्या आणि हलक्या अन्नपदार्थांचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया बिघडत नाही.कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवल्यानंतर अनेक समस्या उद्भवतात. शरीरामध्ये शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण झाल्यानंतर पचनक्रिया बिघडून जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पोट स्वच्छ होण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोणती योगासने करावीत, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: कधी निळ्या रंगाचं केळं पाहिलं आहे का? चव मस्त आणि फायदे जबरदस्त
सकाळी उठल्यानंतर नियमित कपालभाती प्राणायाम केल्यास शरीर आणि मन निरोगी राहील.शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतील. कपालभाती प्राणायाम करताना श्वास सोडताना पोटावर हलका दाब देऊन पोट घट्ट करा. यामुळे स्नायू सक्रिय होतील आणि आतड्यांची हालचाल वाढेल. हे प्राणायाम तुम्ही सकाळी उठल्यानंतर नियमित केल्यास शरीराला अनेक पोट स्वच्छ होईल.
योगाभ्यासात वज्रासनला विशेष महत्व आहे. जेवल्यानंतर किंवा जेवल्यानंतर 10 मिनिटांनी हे आसन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. वज्रासन पचनक्रियेला चालना देण्याचे आणि कॉन्स्टिपेशनपासून आराम मिळवून देण्यास मदत करते. पोटासंबंधित समस्या दूर करण्यासाठी नियमित वज्रासन केल्यास पोट स्वच्छ होईल.
बिघडलेल्या पोटाच्या हालचाली सुधारण्यासाठी नियमित मलासन करावे. यामुळे शारीरिक हालचाली वाढतात आणि आरोग्य सुधारते. गुडघे टेकून बसल्यामुळे पोटावर योग्य तो ताण पडतो आणि पोटात अडकलेला वायू निघून जातो. यामुळे शारीरिक हालचाली सुधारून पोट स्वच्छ होण्यास मदत होते. आतड्यांच्या निरोगी आरोग्यासाठी मलासन अतिशय प्रभावी आहे.
हे देखील वाचा: रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करण्याची सवय आहे? सावध व्हा! होतात अनेक दुष्परिणाम
नियमित 10 सूर्यनमस्कार घातल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल. अपचन, बिघडलेली पचनक्रिया सुधारून पोट स्वच्छ होईल. सूर्यनमस्कार घालताना संपूर्ण शरीराच्या हालचाली होतात. तसेच हा व्यायाम नियमित केल्यास आतड्यांची हालचाल वाढते, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.