
सुनिधीचा वेट लॉस प्लॅन
संगीताच्या जगात तिच्या दमदार आवाजासाठी आणि उत्कृष्ट स्टेज परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या सुनिधी चौहानने अचानक टोन्ड बॉडी मिळवली आहे. सुनिधीने नुकतेच तिच्या फिटनेस आणि डाएटशी संबंधित रहस्ये शेअर केली आहेत. वयाच्या 41 व्या वर्षी या सुनिधीने आपल्या फिटनेसकडे इतके लक्ष दिले आहे की, तिचे हे रूपांतर पाहून सगळेच थक्क झाले आहेत. सुनिधी चौहानचे फिटनेस ट्रेनर विराज सरमळकर यांना दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या परिवर्तन आणि वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल खुलेपणाने सांगितले.
विराजने सांगितले की, सुनिधीने तिच्या नवीन डान्स नंबर ‘आंख’साठी अवघ्या 10 दिवसांत 5 किलो वजन कमी केले आहे. सुनिधीने कोणत्या सिक्रेट आहाराने तिचे वजन कमी केले ते आम्ही तुम्हाला या लेखात सांगत आहोत (फोटो सौजन्य – Instagram)
सुनिधीने सांगितले वजन कसे कमी केले
तिच्या फिटनेस प्रवासाबद्दल बोलताना सुनिधीने स्पष्ट केले की फिटनेससाठी कठोर उपाय किंवा आहाराची गरज नाही, तर केवळ सातत्यच तुम्हाला खरे यश देऊ शकते. तिच्या नवीन गाण्यात सुनिधी अभिनेत्री सान्या मल्होत्रासोबत बिकिनी लुकमध्ये डान्स करताना दिसत आहे.
या गाण्यासाठी सुनिधीने अवघ्या 10 दिवसांत तिचे 5 किलो वजन कमी केले आहे. सुनिधीच्या फिटनेस ट्रेनरने सांगितले की सुनिधी 90 किलो वजन उचलू शकते, 70 किलो स्क्वॅट करू शकते आणि सपोर्टशिवाय काही पुल-अप देखील करू शकते. याशिवाय तिने 5 किलोमीटरची रन 25 मिनिटांत एकाच वेळी पूर्ण केली आहे.
घरातल्या घरात वेट लॉस करण्यासाठी करा ‘हे’ ५ व्यायाम; महिलांसाठी अधिक प्रभावशाली
सुनिधीचे डाएट सिक्रेट
सुनिधी चौहान मानते की फिटनेसचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे योग्य आहार. विराजने सांगितले की सुनिधी तिचा कॅलरी कंट्रोल डाएट प्लॅन फॉलो करते. ती दररोज 1200 पेक्षा कमी कॅलरी शरीरात इनटेक करते. याबद्दल बोलताना सुनिधी म्हणाली की ती यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग करते आणि तिचा उद्देश केवळ वजन कमी करणे नाही तर यकृताला विश्रांती देणे हे आहे. ती दररोज 16 तास उपवास करते आणि 8 तासांच्या कालावधीमध्येच ती अन्न खाते ज्यामुळे तिचे वजन लवकर कमी झाले
कोणते पदार्थ खाते
सुनिधी तिच्या दिवसाची सुरुवात अंड्याने करते आणि कधी कधी आंबट सॉरडो ब्रेडही खाते. ती या मुलाखतीत म्हणाली की, “Intermittent Fasting करताना, आपण प्रथम प्रथिने आणि फॅट्सने दिवसाची सुरुवात केली पाहिजे, कारण हे कार्बोहायड्रेट्सपेक्षा अधिक महत्वाचे आहेत. मला भूक लागली तर मी जेवते. मला सहसा 5 वाजण्याच्या सुमारास भूक लागते आणि त्या वेळी मी नट्स खाते, यामुळे पुढील तीन तास माझे पोट भरलेले राहते. जेव्हा मी वेट लिफ्टिंग करते, जे आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा असते, तेव्हा मी प्रोटीन शेकदेखील पिते. माझा दिवसाचा शेवटचा मील हा संध्याकाळी 7:30 च्या सुमारास आहे. त्यानंतर मी खात नाही”
15 ते 20 किलो होईल वजन त्वरीत कमी, बाबा रामदेव यांचा आयुर्वेदिक फॉर्म्युला करा ट्राय