वेट लॉससाठी रामदेव बाबांचे घरगुती उपाय
लठ्ठपणा ही आता जागतिक समस्या बनली आहे. एवढी गंभीर आरोग्य समस्या ज्याचे लोक जास्त प्रमाणात बळी पडत आहेत. देशातच नव्हे तर जगभरात लठ्ठपणाचे बळी ठरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या म्हणण्यानुसार, जर आपण 2022 सालापर्यंतची आकडेवारी पाहिली तर जगभरात 2 अब्ज प्रौढ लोक लठ्ठपणामुळे बळी गेले आहेत आणि हा आकडा आणखी वेगाने वाढत आहे.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच लठ्ठपणासारख्या गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे आणि लठ्ठपणा आपल्यासह अनेक आजार घेऊन येत आहे. वजन वाढण्यामागची कारणे बघितली तर त्यात बिघडलेली जीवनशैली, अनुवांशिक कारणे आणि चुकीचा आहार, सततचा ताण आणि शारीरिक हालचालींचा अभाव असे म्हटले जाते. याशिवाय काही औषधांच्या सेवनानेही लठ्ठपणा झपाट्याने वाढतो. जर तुम्हीही लठ्ठपणाने त्रस्त असाल आणि सर्व प्रयत्न करूनही वजन कमी करू शकत नसाल तर आज आम्ही तुम्हाला बाबा रामदेव यांचा आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही फार कमी दिवसात चरबीपासून तंदुरुस्त होऊ शकता. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/iStock)
पौष्टिक दलियाचे करावे सेवन
वजन कमी करण्यासाठी दलिया ठरते उत्तम
योगगुरू आणि आयुर्वेदिक तज्ज्ञ बाबा रामदेव यांच्या मते, लठ्ठपणा कमी करण्यासाठी योग्य दैनंदिन दिनचर्या पाळणे खूप महत्वाचे आहे. याशिवाय लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही पौष्टिक दलियाचे सेवन करू शकता. या दलियामध्ये बाजरी, मूग, गहू आणि तांदूळ यांचा समावेश होतो. ही लापशी बनवताना ओवा आणि तीळही टाकले जातात. बाबा रामदेव यांच्या मते, ही लापशी रोज खाल्ल्यास तुमचे पोट सहज भरते आणि वजनही नियंत्रणात राहते. तसंच तुम्हाला अपचन अथवा गॅससारख्या समस्यांपासूनही सुटका मिळते आणि वजन झर्रकन कमी होते.
अश्वगंधाची पाने ठरतील फायदेशीर
अश्वगंधाच्या पानांचा करा उपयोग
अश्वगंधाचे औषधी गुणधर्म आपल्या सर्वांना माहीत आहेत. अश्वगंधा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जी तुम्हाला तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते तर तणाव देखील कमी करू शकते. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, अश्वगंधा सेवन केल्याने चयापचय क्रिया वाढते आणि जलद वजन कमी होण्यास मदत होते. यामुळेच बाबा रामदेव यांनीही याचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.
अश्वगंधाचा वापर कसा करावा
कसे तयार करावे
तुम्हालाही वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर अश्वगंधाच्या पानाचा चहा बनवून सेवन करू शकता. यासाठी सर्वप्रथम अश्वगंधाची पाने चांगली धुवून घ्यावीत. त्यानंतर दोन ग्लास पाण्यात अश्वगंधाची पाने उकळून हे पाणी 5 ते 10 मिनिटे उकळवा आणि नंतर ते गाळून सकाळ संध्याकाळ प्या. असे केल्याने काही दिवसातच तुम्हाला स्वतःमध्ये खूप फरक जाणवू लागेल.
दुधीचा रस ठरेल रामबाण उपाय
वेट लॉससाठी दुधीचा रस ठरेल उत्तम
दुधीचा ज्यूस रोज प्यायल्याने एका महिन्यात वजन 15 ते 20 किलोने कमी होऊ शकते. बाबा रामदेव यांच्या मते, दुधीच्या रसामध्ये खूप कमी कॅलरीज असतात ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. याशिवाय या रसामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि शरीरासाठी इतर आवश्यक पोषक घटक असतात, जे केवळ पोषणच देत नाहीत तर शरीरात चयापचय देखील वाढवतात.
दुधीच्या रसामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे तुमची पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. तसंच दुधी रस हा तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवतो आणि वजन नियंत्रित ठेवतो. केवळ वजन कमीच करत नाही, तर दुधीचा रस रोज सेवन केल्यास गॅस, बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी यासारख्या समस्यांपासूनही सुटका मिळू शकते असेही त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
हेदेखील वाचा – ‘2-2-2 वेट लॉस मेथड’ नक्की काय आहे? सर्रकन येईल वजनाचा काटा खाली
त्रिफळाचे करा सेवन
त्रिफळाचे सेवन तुम्हाला वजन कमी करण्यासाठी ठरेल उपयुक्त
वजन कमी करण्यासाठी आणखी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जी जादूपेक्षा कमी काम करत नाही. आयुर्वेदातील उत्तम अशा त्रिफळाविषयी आम्ही बोलत आहोत, ज्याचे नियमित सेवन केल्याने तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ शकते. त्रिफळा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. त्रिफळा शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते, चयापचय वाढवते आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला गती देते.
व्यायाम आणि योगही ठरते उत्तम
योगा नियमित करणे ठरेल फायदेशीर
वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचाल होणे हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हालाही वाढलेल्या चरबीपासून दूर जायचे आहे आणि तंदुरुस्त व्हायचे असेल, तर योगासन रोजच्या जीवनाचा भाग बनवा. भुजंगासन, पातहस्तासन, सूर्यनमस्कार अशी योगासने तुम्ही करू शकता. ही योगासने शरीराला बळकट करण्यास मदत करतात आणि जलद वजन कमी करण्यास मदत करतात.