दुधाची साय
सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी सर्वच महिला अनेक वेगवेगळे उपाय करतात. महागड्या क्रीम्स, घरगुती उपाय, आयुर्वेदिक उपाय इत्यादी सर्व गोष्टींचा वापर करतात. महागड्या क्रीम्सचा जास्त काळ त्वचेवर प्रभाव दिसून येत नाही. यामुळे हळूहळू त्वचेवर मुरूम, पुरळ येण्यास सुरुवात होते. त्वचेवर पुरळ आल्यानंतर चेहरा खराब होऊन जातो. हे मुरूम घालवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. वारंवार त्वचेवर क्रीम्स किंवा इतर उत्पादने लावल्यामुळे त्वचा पूर्णपणे खराब आणि निस्तेज होऊन जाते.
मुरुमानी भरलेला चेहरा उजळ्वण्यासाठी तुम्ही दुधाच्या सायीचा वापर करू शकता. प्रत्येक घरात दूध हे असतंच. दुधाचे आरोग्याला अनेक गुणकारी फायदे आहेत. दुधामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा मॉइश्चरायझ होण्यास मदत होते. त्वचेवर आलेले मुरुमांचे डाग, निस्तेज झालेली त्वचा उजळ्वण्यासाठी दुधाची साय फायदेशीर आहे. यामुळे त्वचेवर मृत पेशी निघून जाण्यास मदत होते. दुधामध्ये प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, विटामिन डी, बी २, बी १२, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यांसारखे अनेक गुणधर्म आढळून येतात.(फोटो सौजन्य-istock)






