व्यभिचाराचे आरोप की राजकीय कट? लष्करप्रमुखांना हटवल्यानंतर ट्रम्प यांनी काश पटेल यांना लक्ष्य केले असून, तुळसीदेखील त्यांच्या रडारवर आहेत ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Kash Patel FBI firing rumors 2026 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील प्रशासनात सध्या अभूतपूर्व गोंधळ आणि बदलांचे वातावरण आहे. एकामागून एक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना पदावरून हटवले जात असल्याने वॉशिंग्टनमध्ये दहशतीचे वातावरण आहे. अटर्नी जनरल पाम बाँडी आणि लष्करप्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांच्या तडकाफडकी हकालपट्टीनंतर आता संपूर्ण जगाचे लक्ष एफबीआय (FBI) प्रमुख काश पटेल (Kash Patel) आणि राष्ट्रीय गुप्तचर प्रमुख (DNI) तुळसी गबार्ड यांच्याकडे लागले आहे. ‘द अटलांटिक’ने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्या विश्वासातील या दोन बड्या नेत्यांचे भवितव्य आता धोक्यात आले आहे.
एफबीआय प्रमुख काश पटेल यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप लावण्यात आले आहेत. काश पटेल यांनी क्रीडा स्पर्धांना उपस्थित राहण्यासाठी एफबीआयच्या सरकारी जेटचा वापर केल्याचे उघड झाले आहे. इतकेच नाही, तर आपल्या प्रेयसीला स्वॅट (SWAT) संरक्षण देण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील एफबीआयमध्ये त्यांनी अनेक अशा अधिकाऱ्यांना पदावरून हटवले होते जे ट्रम्प यांच्या विरोधात तपास करत होते. मात्र, आता स्वतः काश पटेल यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप लागल्याने ट्रम्प त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : IranUSWar: अमेरिकेचे ‘अजेय’ विमान इराणने पाडले! 82 दशलक्ष डॉलर्सचे F-35 मातीत; स्वदेशी क्षेपणास्त्राने ‘अदृश्य’ शत्रूचा गेम, VIDEO
राष्ट्रीय गुप्तचर प्रमुख तुळसी गबार्ड यांच्याबद्दलही आता प्रशासनात नाराजीचे सूर उमटत आहेत. इराण युद्धाच्या मुद्द्यावरून ट्रम्प आणि गबार्ड यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. इराणच्या युरेनियम संवर्धनाबाबत ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्याला गबार्ड यांनी विरोध दर्शवला होता. तसेच, इराण युद्धाच्या निषेधार्थ राजीनामा दिलेल्या जो केंट यांच्यावर टीका करण्यास गबार्ड यांनी नकार दिला होता. ट्रम्प यांच्या आक्रमक इराण धोरणाशी गबार्ड सहमत नसल्याने, त्यांना गुप्तचर प्रमुख पदावरून हटवले जाण्याची दाट शक्यता आहे.
Thank you for your leadership @SenMcCormickPA – we are crushing the plague of fentanyl in America
thanks to the President’s policies and great support like yours on Capitol Hill. And there’s more to come. 🇺🇸 https://t.co/nEZQMxwpaE — FBI Director Kash Patel (@FBIDirectorKash) April 3, 2026
credit – social media and Twitter
या उलथापालथीची सुरुवात अटर्नी जनरल पाम बाँडी यांच्या हकालपट्टीने झाली. कुप्रसिद्ध एपस्टाईन प्रकरणाशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती दडवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एपस्टाईनचे दस्तऐवज प्रसिद्ध करताना बाँडी यांनी पारदर्शकता राखली नाही, असा ट्रम्प यांचा दावा आहे. याशिवाय होमलँड सिक्युरिटी प्रमुख क्रिस्टी नोएम यांनाही कोणतीही पूर्वसूचना न देता पदावरून हटवण्यात आले, ज्यामुळे प्रशासनातील अंतर्गत अस्थिरता समोर आली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Update: ‘स्वतःला विजयी घोषित करा अन् युद्ध थांबवा’, ट्रम्पला त्यांच्याच भाषेत उत्तर द्या, माजी मंत्र्याचा इराणला मोलाचा सल्ला
संरक्षण क्षेत्रातही ट्रम्प यांनी मोठा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी लष्करप्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांना तात्काळ निवृत्त होण्याचे आदेश दिले आहेत. इराण युद्धामुळे प्रशासनाची प्रतिमा मलीन झाली असून, आता लष्करी नेतृत्वात बदल करून ट्रम्प आपली पकड पुन्हा घट्ट करू इच्छितात. येत्या काही दिवसांत कामगार सचिव आणि इतर महत्त्वाच्या खात्यांमध्येही बदल होण्याची चिन्हे आहेत. या सर्व घडामोडींवरून हे स्पष्ट होते की, ट्रम्प यांना आता केवळ ‘हो’ म्हणणारे अधिकारी हवे आहेत आणि जे थोडेही विरोधात जातील, त्यांना त्वरित बाजूला केले जात आहे.
Ans: काश पटेल यांच्यावर सरकारी जेटचा वैयक्तिक कामासाठी वापर करणे आणि आपल्या प्रेयसीला सरकारी सुरक्षा पुरवण्यासाठी संसाधनांचा गैरवापर केल्याचे आरोप आहेत.
Ans: इराण युद्धाचे धोरण आणि इराणच्या अणुसुविधांवर हल्ला करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाला तुळसी गबार्ड यांनी विरोध केल्याने हा वाद निर्माण झाला आहे.
Ans: एपस्टाईन प्रकरणातील गुप्त माहिती उघड न करणे आणि तपासात अपयशी ठरल्यामुळे पाम बाँडी यांना हटवण्यात आले आहे.






