Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्लोइंग त्वचेसाठी सतत गुलाबपाणी वापरता? मग जाणून घ्या त्वचेचे होणारे गंभीर नुकसान

त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर केला जातो. पण अतिप्रमाणात गुलाब पाणी त्वचेवर लावल्यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे गुलाब पाण्याचा अतिवापर करणे टाळावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 17, 2025 | 09:30 AM
गुलाब पाण्याच्या अतिवापरामुळे त्वचेचे होणारे नुकसान

गुलाब पाण्याच्या अतिवापरामुळे त्वचेचे होणारे नुकसान

Follow Us
Follow Us:

मागील अनेक वर्षांपासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर केला जात आहे. गुलाब पाण्यात असलेले गुणधर्म त्वचा हायड्रेट ठेवण्याचे काम करतात. याशिवाय त्वचा उजळ्वण्यासाठी गुलाब पाणी वापरले जाते. कोणताही फेसपॅक किंवा फेसमास्क तयार करताना गुलाब पाण्याचा वापर केला जातो. त्वचा टवटवीत आणि फ्रेश ठेवण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर केला जातो. नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक ब्युटी प्रॉडक्टमध्ये गुलाब पाण्याचा वापर केला जात आहे. यामुळे त्वचा फ्रेश आणि ताजीतवानी दिसते. गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून बनवलेले गुलाब पाणी त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे. डोळ्यांमध्ये होणारी जळजळ कमी करण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर केला जातो.(फोटो सौजन्य – iStock)

Best Face Oil: चेहरा उजळण्यासाठी ‘हे’ ऑइल ठरेल बेस्ट, दिसाल अजूनच तरुण

गुलाब पाणी त्वचा मॉइश्चरायझ करण्यासाठी मदत करते. याशिवाय यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे त्वचेमध्ये होणारी जळजळ कमी होते आणि चेहरा उजळदार दिसू लागतो. डोळ्यांमध्ये होणारी जळजळ, त्वचेमधील काळेपणा, मुरुमांवरील उपचारासाठी गुलाब पाण्याचा वापर केला जातो. पण नेहमी नेहमी गुलाब पाण्याचा वापर केल्यास त्वचा खराब होण्याची शक्यता असते. त्वचेचे नुकसान होऊन त्वचेची गुणवत्ता खराब होऊ शकते.

गुलाब पाण्याच्या अतिवापरामुळे त्वचेचे होणारे नुकसान:

त्वचा कोरडी पडणे:

त्वचेसाठी गुलाब पाण्याचा अतिवापर केल्यामुळे त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. गुलाब पाण्याचा अधिक वापर केल्यामुळे त्वचेवरील तेल निघून जाऊन त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. याशिवाय त्वचेमधील ओलावा कमी होतो.

ऍलर्जी होण्याची शक्यता:

गुलाब पाण्यामध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहेत. मात्र गुलाब पाण्याचा वापर केल्यामुळे काहींच्या त्वचेवर ऍलर्जी होण्याची शक्यता असते. संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी गुलाब पाण्याचा वापर करू नये.

मुरूम आणि खुणा:

चेहऱ्यावर गुलाब पाणी लावल्यानंतर त्वचेची छिद्र बंद होऊन जातात. ज्यामुळे त्वचेमध्ये साचून राहिलेली घाण त्वचेत तशीच राहते. यामुळे मुरूम किंवा पुरळ येऊ शकतात.त्यामुळे त्वचेसाठी गुलाब पाणी योग्य नाही. गुलाब पाण्याचा अतिवापर केल्यामुळे त्वचेचे नुकसान होऊन संतुलन बिघडून जाते.

भर उन्हाळ्यात ‘या’ पद्धतीने घ्या तेलकट त्वचेची काळजी, चेहरा दिसेल कायम फ्रेश

योग्य प्रमाणात गुलाब पाण्याचा वापर करणे:

त्वचेवर गुलाब पाणी लावताना त्याचा योग्य प्रमाणात वापर करावा. अतिप्रमाणात गुलाब पाणी लावल्यामुळे त्वचेमधील नैसर्गिक तेल कमी होऊन जाते आणि त्वचा कोरडी, निस्तेज दिसू लागते.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Skin damage due to overuse of rose water side effects of applying rose water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2025 | 09:29 AM

Topics:  

  • Beauty Tips
  • glowing face
  • Skin Care

संबंधित बातम्या

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
1

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब
2

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
3

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.