त्वचेसंबंधित 'या' लक्षणांमुळे येऊ शकतो हार्ट अटॅक
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर त्वचेसंबंधित आणि शरीरसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. काहीवेळा शरीरात उद्भवणाऱ्या आजारांचे परिणाम त्वचेवर दिसून येतात. त्यामुळे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी फॉलो न करता शरीराला पचेल असा सकस आहार घेणे गरजेचे आहे. शरीरातील रक्तभिसरण आणि हृदयाच्या कार्यमध्ये अडथळा निर्माण झाल्यावर हार्ट अटॅक सारखी गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. रोजच्या जीवनातील चुकीच्या सवयींचा परिणाम आरोग्यावर नकारात्मक दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागल्यानंतर हृदयाचे आरोग्य धोक्यात येते. शरीरामध्ये साचून राहिलेला पिवळा थर हळूहळू रक्तवाहिन्या बंद करू लागतो. यामुळे हृदयाचे आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला त्वचेसंबंधित कोणत्या समस्या दिसू लागल्यानंतर हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: शारीरिक व्याधींवर आयुर्वेदीक गुणकारी औषध ‘बॉडी रिवाइवल’
अनेकदा त्वचेसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर लवकर दिसू येत नाहीत. त्यामुळे आजार वाढण्याची शक्यता असते. सायनोसिस झाल्यानंतर शरीरावर निळा डाग दिसून येतो. मात्र हा काही डाग काही दिवसांनी पुन्हा निघून जातो. याचा अर्थ शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये पुरेसे ऑक्सिजन पोहचत नाही. ज्यावेळी हृद्य योग्य रित्या पंप करू शकत नाही अशावेळी हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराला दुखापत होण्याची शक्यता असते.
अनेकदा पाठीचा मागील भाग दुखण्यास सुरुवात होते. याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जात. पण हेच लक्षणे हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसून येतात. हातापायांना सूज येणे, पायाचा घोटा दुखणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागल्यास या समस्यांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार घ्यावेत. या स्थितीला पेरिफेरल एडेमा असे सुद्धा बोलले जाते.
हृदयाचा रक्तप्रवाह थांबल्यानंतर त्वचेचा रंग लाल होऊन जातो. त्वचा पूर्णपणे लाल होऊन जाते. ही समस्या शरीरातील रक्तदाबाच्या बदलामुळे उद्भवते. अनियमित हृदयाचे ठोके आणि इतर हृदयासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
हे देखील वाचा: हाडांच्या टेस्टवरून वय कसे ओळखता येते? Baba Siddique मर्डर केसमध्ये झाला वापर
शरीरात कॅल्शियमची पातळी कमी झाल्यानंतर सुद्धा मुंग्या येऊ लागतात. या मुंग्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे येतात. हात, कोपर, गुडघे किंवा पायात प्रामुख्याने येतात. हार्ट अटॅक येण्या मागचं प्रमुख कारण म्हणजे शरीरात वाढलेलं खराब कोलेस्ट्रॉल. त्यामुळे आरोग्याची काळजी घेऊन सकस आहार घेणे आवश्यक आहे.