काय आहे हाडांची टेस्ट ज्यावरून ओळखता येते वय
दसऱ्याच्या दिवशी झिशान सिद्दीकीच्या बांद्र्यातील कार्यालयाबाहेर माजी वडील आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळी मारून हत्या करण्यात आली. यानंतर मुंबईतील राजकारणी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 3 आरोपींना अटक केली आहे. यातील एक आरोपी धर्मराज कश्यप याने आपण अल्पवयीन असल्याचा दावा अटकेनंतर केला.
दरम्यान याचा तपास करण्यासाठी न्यायालयाने आरोपीच्या हाडांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. या चाचणीनंतर आरोपी धर्मराज हा अल्पवयीन नसल्याचे समोर आले आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे की बोन ओसीफिकेशन टेस्ट म्हणजे नेमके काय असते? ही टेस्ट कशासाठी केली जाते आणि याचा नेमका उपयोग काय आहे? या टेस्टचा निकाल कशा पद्धतीने गृहीत धरला जातो, याबाबत आपण अधिक माहिती या लेखातून घेऊ (फोटो सौजन्य – iStock)
काय आहे टेस्ट?
ही टेस्ट नेमकी कशासाठी?
हाडांची ओसीफिकेशन चाचणी ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे वय शोधण्यासाठी हाडांचे विश्लेषण केले जाते. या चाचणीमध्ये शरीराच्या काही हाडांचे एक्स-रे काढण्यात येतात. यासाठीक्लॅव्हिकल, स्टर्नम आणि पेल्विस येथील हाडांचे एक्स-रे घेतले जातात, ज्यामुळे आपल्या हाडांची वाढ किती प्रमाणात आहे हे शोधता येते. ही हाडे निवडण्याचे कारण वाढत्या वयाबरोबर त्यांच्या आकारात आश्चर्यकारक बदल होतात आणि यावरून वयाचा अंदाज लावता येतो.
हेदेखील वाचा – पाठीचा कणा ताठ ठेवण्यासाठी नियमित करा ‘ही’ आसन,पाठ दुखी होईल कमी
वय ओळखण्याचा मार्ग
काही हाडे मानवी विकासाच्या टप्प्यावर अवलंबून विशिष्ट वयात एकमेकांशी घट्ट होतात आणि एकमेकांशी जुळत असल्याने, हाडे वय ओळखण्याचा एक मार्ग असू शकतात. बाबा सिद्दीकीच्या हत्येतील आरोपी धर्मराज कश्यपच्या प्रकरणातही बोन ऑसिफिकेशन टेस्टची मदत घेण्यात आली होती. भारतीय न्यायालयानुसार, अनेकदा या चाचणीचा अवलंब करतात, परंतु काहीवेळा ही पद्धत वय निर्धारित करण्यासाठी पूर्णपणे परिपूर्ण मानली जात नाही.
कशी आहे प्रक्रिया
या टेस्टची प्रक्रिया नेमकी काय आहे?
ओसीफिकेशन हाडांच्या निर्मितीची प्रक्रिया आहे. ही चाचणी संयुक्त सहभागाच्या आधारावर केली जाते, जी जन्मापासून ते 25 वर्षांच्या दरम्यान होते. या चाचणीचा उपयोग घटनेच्या दिवशी आरोपी किंवा पीडितेचे वय किती आहे हे ठरवण्यासाठी केला जातो. ही चाचणी विशेषतः अल्पवयीन मुलांचा समावेश असलेल्या प्रकरणांमध्ये महत्त्वाची ठरते.
खेळाडूंसाठी वापरली जाते टेस्ट
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, खेळाडू त्यांच्या तरुण वयाचा दाखला देऊन अंडर-17 किंवा अंडर-19 स्पर्धेत भाग घेण्याचा प्रयत्न करतात, अशा परिस्थितीत हाडांची ओसीफिकेशन चाचणी त्यांचे योग्य वय उघड करू शकते. त्यामुळे आता कुणी वय लपवण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर क्रीडा प्राधिकरणाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.