६ तासांपेक्षा कमी वेळ झोपल्यामुळे आरोग्यावर दिसून येतात 'हे' गंभीर परिणाम
दिवसभर काम करून थकल्यानंतर शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते. २४ तासांमध्ये ७ ते ८ तास शांत झोप घेणे आवश्यक आहे. मात्र बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत मानसिक तणाव, आहारात होणारे बदल, थकवा, अशक्तपणा इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. झोपेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. त्यामुळे शांत झोप घेणे गजरेचे आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मेंदूच्या आरोग्याला हानी पोहचते. योग्य विश्रांती घेतल्यामुळे मेंदूच्या पेशी दुरुस्त होतात, हार्मोन्स संतुलित ठेवणे, स्नायूंना पुनःशक्ती देणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे इत्यादी अनेक फायदे शरीराला होतात.(फोटो सौजन्य – istock)
झोपेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा, चिडचिडेपणा, स्मरणशक्ती कमी होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. याशिवाय शरीराला गंभीर आजाराची लागण होण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ६ तासांपेक्षा कमी वेळ झोपल्यामुळे शरीरावर कोणते पारिणाम दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. झोपेची कमतरता भरून काढण्यासाठी ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे.
झोपेचा थेट संबंध मेंदूशी असतो. रात्रीच्या वेळी पुरेशी झोप न घेतल्यामुळे मेंदूची स्मरणशक्ती कमी होऊन जाते. याशिवाय कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करताना अनेक अडचणी निर्माण होतात. याशिवाय प्रतिसाद देण्याची गती कमी होऊन जाते, ज्याचा परिणाम काम आणि गाडी चालवताना शरीरावर लगेच दिसून येतो. मेंदूच्या आरोग्याला हानी पोहचल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात.
शरीरात वाढलेल्या मानसिक तणावामुळे आरोग्याला हानी पोहचते. कमी झोपेमुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम दिसून येतात. ५ ते ६ तासांपेक्षा कमी वेळ झोपल्यामुळे हार्ट अटॅक येण्याची जास्त शक्यता असते. झोपेमुळे हृदयाच्या स्नायूंना आराम मिळतो. त्यामुळे नियमित ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे.
हार्मोन्सचे असंतुलन झाल्यानंतर शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतात. शरीरात भूक, ताण, आनंद किंवा तृप्ती नियंत्रणात करण्यासाठी अनेक वेगवेगळे हार्मोन्स असतात. घ्रेलिन आणि लेप्टिन हे दोन हार्मोन्स भूकेवर नियंत्रण ठेवतात. पण या हार्मोन्सवर परिणाम झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. ताणतणाव वाढवणारे हार्मोन्स अनियंत्रित झाल्यानंतर संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
अल्झायमर म्हणजे काय? गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीला दिसून येतात ‘ही’ लक्षणे
कमी झोपल्याने होणारे दुष्परिणाम:
पुरेशी झोप न मिळाल्यास चिंता आणि ताण वाढतो, ज्यामुळे झोपायला त्रास होऊ शकतो. लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते. रोगप्रतिकारशक्ती कमी होते, ज्यामुळे तुम्ही लवकर आजारी पडू शकता.
जास्त झोपल्याने होणारे दुष्परिणाम:
शरीरात चरबी जमा होते, ज्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो. जास्त झोपणे हे डिप्रेशनशी संबंधित असू शकते. जास्त वेळ झोपणाऱ्या लोकांना उच्च रक्तदाबाचा धोका असतो.
झोपेशी संबंधित औषधांचे दुष्परिणाम:
काही झोपेच्या औषधांमुळे (उदा. Zopiclone) तोंडाला विचित्र चव येणे, चक्कर येणे, थकवा येणे आणि तोंडाला कोरडेपणा येणे असे दुष्परिणाम दिसू शकतात.