आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी 'हे' पाणी ठरेल प्रभावी
दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. काहीवेळा सतत तिखट किंवा अतितेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोटात गॅस किंवा अपचनाची समस्या उद्भवते. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. सतत जंक फूड, पिझ्झा किंवा इतर पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात होणाऱ्या बदलांकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून न गेल्यामुळे शरीरात तसेच साचून राहतात. ज्यामुळे किडनी आणि लिव्हरवर गंभीर परिणाम होतो. किडनी आणि लिव्हरच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीर योग्यरीत्या डिटॉक्स होत नाही. आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे आणि शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे सुरुवातीला पिंपल्स येणे, थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. मात्र कालांतराने हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा इत्यादी आजारांची शरीराला लागण होते.(फोटो सौजन्य – istock)
रोज धुवाल तर केस स्वच्छ नाही, पूर्णपणे सफाचट होतील! मग काय करावे? जाणून घ्या
शरीरात होणाऱ्या बदलांकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा शरीराला गंभीर आजारांची लागण होते. पचनक्रिया बिघडल्यानंतर अनेक लोक वारंवार दुर्लक्ष करतात, पण असे न करता औषध उपचार करणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीर नियमितपणे डिटॉक्स करण्यासाठी आहारात कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. नियमित डिटॉक्स पेयांचे सेवन केल्यामुळे पचनसंस्था सुरळीत राहते, मेटॅबॉलिझम सुधारते आणि शरीराला अनेक फायदे होतात.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी काकडी लिंबू आणि पुदिन्याच्या पानांपासून बनवलेल्या पेयाचे सेवन करावे. या पेयाच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. १ लिटर पाण्यात काकडीचे तुकडे, लिंबू, पुदिन्याची पाने आणि काळे मीठ टाकून मिक्स करा. तयार केलेले पाणी रात्रभर तसेच ठेवून सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी सेवन करावे. यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि विषारी घटक बाहेर पडून जातात. लिंबाच्या रसात विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येते. वाढलेले वजन कमी करताना लिंबाच्या पाण्याचे सेवन करावे.
सकाळी उठल्यानंतर नियमित कोमट पाण्याचे सेवन करावे. कोमट पाण्याच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. याशिवाय कोमट पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. कोमट पाण्यात तुम्ही मध मिक्स करून सुद्धा पिऊ शकता. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत होते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी नियमित कोमट पाण्याचे सेवन करावे.
अनेकांच्या दिवसाची सुरुवात सकाळी उठल्यानंतर ग्रीन टी ने होते. ग्रीन टी चे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. त्यामुळे नियमित सकाळी ग्रीन टी प्यावा. ग्रीन टी चे सेवन केल्यामुळे त्वचेचा रंग सुधारतो, पचनक्रिया सुधारते, मेंदूची कार्यक्षमता वाढते इत्यादी अनेक फायदे शरीराला होतात.
डिटॉक्स वॉटर पिण्याचे फायदे काय आहेत?
डिटॉक्स वॉटर रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्याचा एक सोपा मार्ग आहे. हे शरीराला हायड्रेटेड (पाणीयुक्त) ठेवण्यास मदत करते. चमकणाऱ्या त्वचेसाठी डिटॉक्स वॉटर उपयुक्त आहे.
डिटॉक्स वॉटर कसे बनवायचे?
एका भांड्यात पाणी घ्या. त्यात तुमच्या आवडीची फळे (उदा. लिंबू, संत्रे), भाज्या (उदा. काकडी) किंवा औषधी वनस्पती (उदा. पुदिना) घालून ते बराच वेळ भिजत ठेवा.
डिटॉक्स वॉटरचे काही सामान्य प्रकार कोणते आहेत?
लिंबू आणि पुदिना असलेले पाणी, काकडी आणि पुदिना असलेले पाणी,संत्रे आणि चिया सीड्स असलेले पाणी.