मेंदूमध्ये झपाट्याने वाढत आहेत रक्ताच्या गाठी, शरीर देत असतो हे संकेत; चुकूनही दुर्लक्ष करू नका
आपल्या शरीरातील महत्त्वपूर्ण अवयवांपैकीच एक म्हणजे आपला मेंदू. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच मेंदूचीही नित्यनियमाने काळजी घ्यावी लागते अन्यथा मेंदूचा आजार होण्याची शक्यता असते. मेंदूचा कॅन्सर हा आजार अधिकतर लोकांना जडत आहे, यामध्ये मेंदूच्या ऊतींमध्ये कर्करोगाच्या पेशी विकसित होतात. या कॅन्सरच्या पेशी वाढतात आणि मेंदूच्या वेगवेगळ्या भागात पसरतात, जे खूप धोकादायक आहे. मोठ्यांबरोबरच लहानांनाही मेंदूच्या कॅन्सरचा धोका असतो. अनेकांना फार वेळानंतर या आजाराची कल्पना होतो. परंतु आपले शरीर फार आधीपासून आपल्याला या आजाराचे संकेत देत असतो. अशात वेळीच या संकेतांकडे लक्ष दिल्यास तुम्ही यापासून स्वतःचे संरक्षण करू शकता.
मेंदूचा कॅन्सर अथवा ब्रेन ट्युमर हा एक असा आजार आहे ज्यावर वेळेत उपचार न केल्यास मृत्यूचा धोका देखील वाढत असतो. देशातही नाही तर संपूर्ण जगात ब्रेन ट्युमर ही एक मोठी समस्या आहे. ब्रेन ट्यूमर ही मेंदूतील असामान्य पेशींच्या अनियंत्रित वाढीची समस्या आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीच्या काही सामान्य लक्षणांकडे लक्ष दिल्यास ब्रेन ट्युमरची समस्या वेळीच टाळता येते.
सिगारेटच्या व्यसनातून मुक्त व्हायचं असेल तर आजपासूनच ‘या’ 2 रुपयांच्या पदार्थाचे सेवन सुरु करा
दृष्टी कमी होणे
अचानक दृष्टी कमी होणे किंवा अंधुक दिसणे हे ब्रेन ट्युमरचे लक्षण असू शकते. दृष्टी किती प्रमाणात प्रभावित होते हे मेंदूतील ट्यूमरचे स्थान आणि आकार यावर अवलंबून असते. मेंदूच्या पुढच्या भागातून, जिथे घाणेंद्रियाची सुरुवात होते, ट्यूमरची उत्पत्ती होत असेल, तर त्याचा तुमच्या वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असतो.
ब्रेन ट्युमरची मुख्य लक्षणे
ब्रेन ट्युमरच्या सुरवातीच्या टप्प्यात आपल्या शरीरात काही लक्षणे जाणवत असतात. या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन आणि यावर योग्य ते उपचार करून तुम्ही या आजरापासून स्वतःची सुटका करू शकता.
पाण्यात एक चमचा हा पदार्थ मिसळून प्या, झोपेतही वितळेल चरबी; अंथरुणात जाताच येईल शांत झोप
ब्रेन ट्युमरची समस्या
मेंदूमध्ये असामान्य पेशींची वाढ होणे म्हणजेच ब्रेन ट्यूमर. या आजराची लक्षणे मेंदूच्या त्या भागावर अवलंबून असतात जिथे पेशी असामान्यपणे वाढत असतात. उदाहरणार्थ, मेंदूच्या सेरिबेलममध्ये ट्यूमर वाढू लागल्यास, रुग्णाला शारीरिक समन्वय, चालणे आणि अगदी सामान्य काम करण्यातही अडचण येऊ शकते. तयाचबरोबर या ट्यूमरचा आकार वाढला की ही लक्षणे तीव्र होऊ लागतात. साधारणपणे काही लक्षणे सुरुवातीला लक्षात ठेवली तर वेळेवर निदान आणि उपचार करणे सोपे जाते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.