Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोकरदार महिलांमध्ये वाढतेय धूम्रपानाचे प्रमाण; ताण कमी करण्यासाठी घेतला जातोय आधार

सध्या पुरुषांच्या बरोबरीने महिला स्मोकिंग करताना दिसून येतात. सर्वात जास्त प्रमाण हे नोकरदार महिलांमध्ये वाढल्याचे दिसून येत आहे. पण याचा नक्की काय दुष्परिणाम होतोय आपण जाणून घेऊ

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 04, 2025 | 11:09 AM
महिलांमधील धुम्रपान का वाढतेय (फोटो सौजन्य - iStock)

महिलांमधील धुम्रपान का वाढतेय (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • सुमारे २०% नोकरदार महिला या कामाच्या तणावामुळे धूम्रपान करतात आणि या महिलांमध्ये भविष्यात फुफ्फुसाचा कर्करोगाचा धोका वाढतो
  • दर महिन्याला २५ ते ३५ वयोगटातील १० पैकी ३ नोकरदार महिला खोकल्याची तक्रार घेऊन उपचाराकरिता तज्ज्ञांची भेट घेत असल्याचे आढळून आले आहे
  • काय आहेत कारणे जाणून घ्या 

तणाव हा नोकरदार महिलांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे, ज्यामुळे अनेक महिला धूम्रपानासारख्या वाईट सवयींच्या आहारी जातात. सुमारे २०% नोकरदार महिला या कामाच्या तणावामुळे धूम्रपान करतात आणि या महिलांमध्ये भविष्यात फुफ्फुसाचा कर्करोगाचा धोका वाढतो. या महिलांना भविष्यात फुफ्फुसाचा कर्करोग आणि इतर दीर्घकालीन फुफ्फुसांच्या विकारांचा धोका असतो.  हे टाळण्यासाठी धूम्रपानाचे व्यसन सोडणे गरजेचे आहे.  जागतिक फुफ्फुस कर्करोग दिनानिमित्त तज्ज्ञांकडून महिलांना त्यांच्या फुफ्फुसांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचे आणि धूम्रपानाचे व्यसन टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

किती आहे प्रमाण?

दर महिन्याला २५ ते ३५ वयोगटातील १० पैकी ३ नोकरदार महिला खोकल्याची तक्रार घेऊन उपचाराकरिता तज्ज्ञांची भेट घेत असल्याचे आढळून आले आहे.  फुफ्फुसाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी नियमितपणे उपचार आणि फॅालोअप घेणे गरजेचे आहे.

कामाचा ताण वाढत असताना धूम्रपानाचा अवलंब करणे या चिंताजनक ट्रेंडमुळे येत्या काळात फुफ्फुसाचा कर्करोग, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), दमा आणि ब्राँकायटिस होण्याची शक्यता वाढली आहे. धूम्रपान-संबंधित फुफ्फुसांच्या समस्यांमध्ये वाढ होत असताना, वेळीच ही सवय टाळण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. वेळीच निदान व उपचार तसेच फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत पुरेशी जागरूकता करण्यावर भर देणे गरजेचे आहे.

Pregnancy Tips: धूम्रपानाचे व्यसन आई आणि बाळासाठी जीवघेणे, त्वरीत व्हा दूर

काय आहे कारण?

हल्ली कामाच्या ठिकाणी असलेली डेडलाइन, कामाचे वाढते तास, अपेक्षांचे ओझे, घर आणि ॲाफीस या दोघांचे योग्य असंतुलन राखणे अशा अनेक समस्यांना महिलावर्गास तोंड द्यावे लागते. वाढत्या कामांच्या तासामुळे पुरेशी विश्रांती न मिळाल्याने ताण येऊ शकतो. शिवाय ताणतणावामुळे थकवा येणे, चिंता सतावणे, झोपेसंबंधी समस्या, डोकेदुखी, स्नायूंवर ताण येणे आणि मूड स्विंग्स सारखी लक्षणे दिसून येतात. 

काही महिला तणाव कमी करण्यासाठी किंवा कामाच्या ठिकाणी सतर्क राहण्यासाठी धूम्रपानाच्या व्यसनाची निवड करू शकतात. मात्र धुम्रपान हे फुफ्फुसांना नुकसान पोहोचवते. कालांतराने, ते फुफ्फुसांच्या नाजूक अस्तरांना हानी पोहोचवते, त्यांची क्षमता कमी करते आणि श्वास घेण्यास अडचणी येतात. सिगारेटमधील हानिकारक रसायने थेट फुफ्फुसांचा कर्करोग, ब्राँकायटिस, दमा आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) अशा समस्यांना आमंत्रण देत असल्याची प्रतिक्रिया अपोलो स्पेक्ट्रा, पुणे येथील इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. आदित्य देशमुख यांनी स्पष्ट केले.

तज्ज्ञ काय सांगतात?

डॉ. देशमुख पुढे सांगतात की, कामाच्या ठिकाणी महिलांना प्रचंड ताणतणावाचा सामना करावा लागत आहे, त्यांच्यासाठी धूम्रपान हा तात्पुरता उपाय वाटू शकतो, परंतु प्रत्यक्षात ते दीर्घकालीन आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. सुमारे २०% नोकरदार महिला ताणतणावामुळे धूम्रपान करण्यास प्रवृत्त होतात आणि भविष्यात त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. 

धूम्रपानामुळे अशा महिलांची फुफ्फुसंदेखील कमकुवत होतात. दरमहा, २५-३५ वयोगटातील १० पैकी ३ नोकरदार  महिला खोकल्याची तक्रार घेऊन रुग्णालयात उपचाराकरिता येतात.  धूम्रपानाचे व्यसन टाळणे हे फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. यामुळे शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांना सुरळीतपणे ऑक्सिजनचा पुरवठा होतो, ऊर्जेची पातळी वाढते आणि फुफ्फुसांचे कार्य सुधारते. नियमित शारीरिक हालचाली, दिर्घ श्वास घेणे, हायड्रेशन आणि वार्षातून एकदा फुफ्फुसांच्या आरोग्याची तपासणी करणे गरजेचे आहे.

World Hypertension Day: तणाव, धूम्रपान तसेच मद्यपानामुळे 25% तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या, 10 पैकी 8 जण बळी

कोणते विकार होतात?

कामाच्या ठिकाणी येणाऱ्या सततच्या तणावामुळे सुमारे १०% नोकदार महिला या धूम्रपान करण्यास प्राधान्य देतात. कालांतराने, धूम्रपान फुफ्फुसांच्या कार्याला बाधा आणते आणि फुफ्फुसांचा कर्करोग आणि इतर श्वसन विकारांना आमंत्रण देते. दर महिन्याला २७ ते ३५ वयोगटातील १० पैकी २ महिला सतत खोकला, थकवा आणि श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणं घेऊन उपचाराकरिता दाखल होतात. 

कसा करावा उपाय?

फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान छातीच्या एक्स-रे आणि सीटी स्कॅनद्वारे केले जाऊ शकते, त्यानंतर कर्करोगाच्या पेशींची उपस्थिती निश्चित करण्यासाठी बायोप्सी केली जाते. निदान निश्चित झाल्यानंतर उपचार हे कर्करोगाच्या टप्प्यावर अवलंबून असतात आणि त्यात शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, टार्गेट्ड थेरपी किंवा या सर्वांचा समावेश असू शकतो. 

धूम्रपानाची सवय सोडणे, घरातील प्रदूषण कमी करणे, पुरक आहार घेणे आणि योगा किंवा मेडिटेशन सारख्या तणाव व्यवस्थापन तंत्रांमुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाची शक्यता कमी होऊ शकते, अशी प्रतिक्रिया डॉ. ज्योती मेहता, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटर, तळेगाव यांनी व्यक्त केली.

Web Title: Smoking rates are increasing among working women is being used to reduce stress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 11:09 AM

Topics:  

  • Health Tips
  • quite smoking tips
  • smoking

संबंधित बातम्या

आळसामुळे तुम्ही बदलत नाही Panty? ही घाणेरडी सवय धोक्यात आणेल तुमची Vaginal Health
1

आळसामुळे तुम्ही बदलत नाही Panty? ही घाणेरडी सवय धोक्यात आणेल तुमची Vaginal Health

10-10-10 नियम कराल फॉलो तर कधीच होणार नाही Diabetes, आयुष्यभर रहाल तंदुरुस्त; न्यूट्रिशनिस्टचा खुलासा
2

10-10-10 नियम कराल फॉलो तर कधीच होणार नाही Diabetes, आयुष्यभर रहाल तंदुरुस्त; न्यूट्रिशनिस्टचा खुलासा

महिलांच्या ‘या’ सवयी बिघडवत आहेत हार्मोनल संतुलन, हेल्दी राहण्यासाठी आजच करा ‘हे’ बदल
3

महिलांच्या ‘या’ सवयी बिघडवत आहेत हार्मोनल संतुलन, हेल्दी राहण्यासाठी आजच करा ‘हे’ बदल

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर
4

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.