Masala Mirchi Recipe : साध्या जेवणातही दोन घास जास्तीचे खाल, झटपट घरी बनवा चटकेदार मसाला मिरची. जुन्या काळापासून चालत आलेली ही रेसिपी तुमच्या जेवणाची चव वाढवेल.
भारतीय स्वयंपाकघरात मसाल्यांचा सुवास आणि चवीचा खास संगम आढळतो. तिखट, मसालेदार आणि सुगंधी पदार्थांच्या चाहत्यांसाठी ‘मसाला मिरची’ ही रेसिपी म्हणजे एक अप्रतिम चवदार भेट आहे. पारंपारिक मराठी जेवणात ही डिश भात, पोळी, भाकरी किंवा अगदी दह्यासोबतही अप्रतिम लागते. विशेष म्हणजे, मसाला मिरची बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि ही डिश लंच बॉक्ससाठीही उत्तम पर्याय आहे. ही डिश बनवताना वापरल्या जाणाऱ्या भाजलेल्या मसाल्यामुळे मिरचीची चव अधिक उठून दिसते. जर तुम्हाला थोडेसे तिखट पण सुगंधी काही खायचे असेल, तर ही मसाला मिरचीनक्की करून बघा.
यासाठी सर्वप्रथम मिरच्या स्वच्छ धुवून त्यांचे देठ कापून घ्या. नंतर प्रत्येक मिरचीला मधोमध एक चीरा द्या पण पूर्ण फोडू नका.
एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यात शेंगदाणे, धणे, जिरे आणि खवलेला नारळ टाका. हे सर्व मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
भाजलेले साहित्य थंड झाल्यावर मिक्सरमध्ये टाका आणि त्यात मीठ, हळद, लाल तिखट आणि चिंच घालून जाडसर वाटून घ्या. हा मिरचीचा मसाला तयार आहे.
प्रत्येक मिरचीमध्ये हा तयार मसाला भरून घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी व हिंग टाका.
नंतर तयार भरलेल्या मिरच्या सावधपणे तेलात घाला आणि झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा. मध्ये मध्ये
मिरच्या पलटवा जेणेकरून त्या सर्व बाजूंनी समान शिजतील.
सुमारे 8-10 मिनिटांनी मसाला मिरची छान शिजून तयार होईल. गरम भाकरी, पोळी किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.