Schezwan Noodle Recipe : विकत नको, घरी बनवा ताजे, चटपटीत स्ट्रीट स्टाईल ‘शेझवान नूडल्स’
Recipe : शेझवान नूडल्स म्हणजे सर्वांच्या आवडीचा पदार्थ. बाहेरील अस्वच्छ खाण्याऐवजी तुम्ही हा स्ट्रीट फूड घरीच बनवून खाऊ शकता. चला याची रेसिपी नोट करुन घेऊयात.
Schezwan Noodle Recipe : विकत नको, घरी बनवा ताजे, चटपटीत स्ट्रीट स्टाईल 'शेझवान नूडल्स'
Follow Us
Follow Us:
इंडो चायनीज फूड लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे.
फेसळयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढत असून घरीच तयार केलेले पदार्थ आरोग्यासाठी अधिक चांगले ठरतात.
चला शेझवान नूडल्सची रेसिपी जाणून घेऊया.
चायनीज पदार्थांची आवड असणाऱ्यांसाठी शेजवान नूडल्स हा झटपट तयार होणारा आणि चविष्ट पर्याय आहे. नूडल्समध्ये रंगीबेरंगी भाज्या, शेजवान सॉस आणि विविध मसाल्यांचा वापर केल्यामुळे त्याला तिखट, चटपटीत आणि स्वादिष्ट चव मिळते. विशेष म्हणजे हा पदार्थ बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही. घरातील उपलब्ध भाज्यांचा वापर करून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने रेस्टॉरंटसारखे व्हेज शेजवान नूडल्स तयार करू शकता. संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यावर, विकेंडला काहीतरी वेगळे खायचे असल्यास किंवा घरच्या घरी पार्टीसाठी मेनू ठरवताना ही रेसिपी नक्की करून पाहता येईल. चला तर मग जाणून घेऊया चटपटीत व्हेज शेजवान नूडल्स बनवण्याची सोपी रेसिपीनोट करून घेऊयात.
एका मोठ्या भांड्यात पाणी उकळून त्यात थोडे मीठ आणि काही थेंब तेल घाला. त्यामध्ये नूडल्स टाकून पॅकेटवरील सूचनेनुसार शिजवा. नूडल्स मऊ झाल्यावर लगेच गाळून थंड पाण्याखाली धुवा आणि बाजूला ठेवा.
कढई किंवा वोकमध्ये तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेले आले आणि लसूण घालून काही सेकंद परता.
त्यानंतर कांदा, गाजर, शिमला मिरची आणि कोबी घाला. भाज्या मोठ्या आचेवर थोड्या कुरकुरीत राहतील अशा पद्धतीने परता.
भाज्यांमध्ये शेजवान सॉस, सोया सॉस आणि टोमॅटो सॉस घाला. त्यानंतर व्हिनेगर आणि मिरी पावडर मिसळा. सर्व साहित्य मोठ्या आचेवर व्यवस्थित एकत्र करा.
आता शिजवलेले नूडल्स कढईमध्ये घाला. नूडल्स तुटणार नाहीत याची काळजी घेत दोन चमचे किंवा चिमट्याच्या मदतीने हलक्या हाताने सर्व मिश्रण एकत्र करा.
नूडल्समध्ये मीठ आवश्यकतेनुसार घाला. सोया सॉस आणि शेजवान सॉसमध्ये आधीच मीठ असल्याने मीठ कमी प्रमाणात वापरा.
नूडल्स २ ते ३ मिनिटे मोठ्या आचेवर परतत राहा. त्यामुळे सॉस नूडल्सला व्यवस्थित लागतो आणि भाज्यांचा कुरकुरीतपणाही टिकून राहतो.
गॅस बंद करून वरून बारीक चिरलेला स्प्रिंग ओनियन घाला. गरमागरम व्हेज शेजवान नूडल्स सर्व्ह करा. सोबत शेजवान चटणी किंवा तुमच्या आवडीचा सॉस देता येईल.
Web Title: Street style schezwan noodle recipe in marathi