
गणपती उत्सवात १० मिनिटांमध्ये बनवा रबडीसारखी घट्टसर शाही साबुदाणा खीर
Ganeshotsav 2026: सणावारांच्या दिवसांमध्ये घरात वेगवेगळे गोडाचे पदार्थ बनवले जातात. शेवयांची खीर, गुलाबजाम, बासुंदी, रव्याची खीर इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ बनवण्याऐवजी वाटीभर साबुदाण्याचा वापर करून घट्टसर शाही साबुदाणा खीर बनवावी. ही चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा चांगली आहे. उपवासाच्या दिवशी कायमच तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी साबुदाण्यांपासून बनवलेली खीर खावी. बऱ्याचदा खीर बनवताना दूधच फाटून जाते तर कधी खीर कढईला चिकटून जाते. त्यामुळे खीर बनवण्यासाठी या पद्धतीचा वापर केल्यास पदार्थाची चव अजिबात बदलणार नाही आणि खायला सुद्धा मस्त लागेल. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरात वेगवेगळे पदार्थ कायमच बनवले जातात. त्यात तुम्ही साबुदाण्याची चविष्ट खीर बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रबडीसारखी घट्टसर शाही साबुदाणा खीर बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Ganeshotsav 2026 : सणाचा गोडवा वाढवा, घरी बनवा मार्केट स्टाईल खुशखुशीत ‘बालुशाही’