
सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी
Masala Appe Recipe: दक्षिण भारतीय पदार्थ केवळ भारताचं नाहीतर संपूर्ण जगभरात फेमस आहेत. इडली, डोसा, अप्पे, उत्तप्पा यांसारखे पदार्थ केवळ सकाळच्या नाश्त्यात नाहीतर जेवणात सुद्धा खाल्ले जातात. खोबऱ्याची चटणी आणि सांबार इडली, डोसासोबत आवडीने खाल्ले जाते. डाळ, तांदूळ भिजवून त्यापासून विविध पदार्थ बनवले जातात. सणावारांच्या दिवसांमध्ये सगळ्यांकडेच पाहुणे येतात. पाहुण्यांच्या नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इतर वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे पाहुण्यांना नवीन काहींना काही पदार्थ बनवून खाऊ घालायचा असेल तर झटपट तयार होणारे रव्याचे आप्पे अतिशय उत्तम आहेत. रव्याचे आप्पे १० ते १५ मिनिटांमध्ये तयार होतात आणि वेगवेगळ्या भाज्या टाकून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया मसाला आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)