एका मिनिटांतच ड्रमवरील घट्ट-चिवट डाग होतील दूर, बिळबिळीत ड्रमाला अशाप्रकारे करा क्लिन
जवजवळ प्रत्येकाच्याच घरात पाणी भरण्याची टाकी वापरली जाते. पाणी भरण्यासाठी वापरली जाणारी ही टाकी घरात फार उपयोगी पडत असते. पुन्हा पुन्हा या टाकीचा वापर केल्याने टाकी खराब होते आणि यावर चिवट डाग बसतात. सतत पाणी साचत राहिल्याने ते खूप लवकर घाण होते आणि त्याला बिळबिळीतपणा येऊ लागतो. यामुळे डास आणि कीटकांची पैदास होऊ लागते ज्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होतो. अशात वेळोवेळी आपल्या घरातील ही पाण्याची टाकी क्लीन करणे फार गरजेचे असते. पाण्याची टाकी साफ करणे अनेकदा कठीण होऊन बसते. मात्र आज आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत जिच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील पाण्याची टाकी क्षणात स्वछ करू शकता आणि मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला फार मेहनत घेण्याचीही गरज नाही.
तुरटीचा वापर करा
बाजारात विकत मिळणार्या तुरटीने तुम्ही पाण्याची टाकी स्वछ करू शकता. यासाठी सर्वप्रथम पाण्याची टाकी रिकामी करा आणि यातील सर्व पाणी बाहेर काढा. आता एका बादली पाण्यात भरपूर तुरटी घाला आणि काही वेळ तसेच राहू द्या. काही वेळाने, बादलीतील पाणी टाकीमध्ये ओतून घ्या. असे केल्याने टाकीतील सर्व घाण तळाशी स्थिर होईल. काही वेळ हे पाणी टाकीत असेच राहूद्या आणि मग काही वेळाने टाकी पूर्णपणे रिकामी करा. यानंतर, टाकीच्या पृष्ठभागावर साचलेली घाण स्वच्छ कापडाच्या मदतीने पुसून घ्या.
ब्लिच लिक्विडचा वापर करा
बाजारात ब्लिच लिक्विड किंवा पावडरचा वापर करा. याला वॉटर टँक क्लीनर म्हणून देखील वापरले जाते. याच्या मदतीने पाण्याची टाकी क्षणात साफ करता येते. हे ते वापरण्यासाठी, प्रथम 400 ग्रॅम पावडर ब्लीच किंवा 300 ग्रॅम लिक्विड ब्लीच घ्या. आता हे प्रमाण 10 लिटर पाण्यात मिक्स करा. काही मिनिटांनंतर हे मिश्रण पाण्याच्या टाकीत ओता आणि तसेच राहूद्या. सुमारे 15 मिनिटांनी पाण्याची टाकी रिकामी करा आणि मग पाण्याने टाकी धुवून काढा. यामुळे टाकीत साचलेली सर्व घाण निघून जाईल.
मिठाचा करता येईल वापर
पाण्याची टाकी स्वछ करण्यासाठी तुम्ही डिशवॉश आणि मिठाचा वापर करू शकता. या दोन्ही गोष्टी एका भांड्यात सामान प्रमाणात घ्या आणि पाण्याच्या मदतीने याचे एक द्रावण तयार करा. हे द्रावण नंतर पाण्याच्या टाकीत टाका आणि काहीवेळाने पाणी टाकून ते तसेच राहूद्या. 15 मिनिटांनंतर हे टाकीतील सर्व पाणी रिकामे करा आणि नंतर मग पाण्याने टाकी स्वछ करा. याच्या मदतीने तुम्ही सहज तुमच्या घरातील पाण्याची टाकी स्वछ करू शकता.