(फोटो सौजन्य – Pinterest)
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. आपल्या व्यस्त जीवनातून थोडा मोकळा वेळ काढून प्रवास करणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरू शकते. प्रवास आपले मानसिक आरोग्य सुधारते आणि ताणतणाव दूर करण्यास मदत करते. अशात तुम्ही जर या सुट्टीत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, नेहमीच्या गर्दीपासून दूर एका शांत आणि सुंदर ठिकाणाला भेट देऊन तुम्ही तुमच्या सुट्टीचा आनंद संस्मरणीय करू शकता.
आज आम्ही तुम्हाला उत्तराखंडातील एका अतिशय सुंदर तलावाची माहिती सांगणार आहोत, इथले सौंदर्य तुमचे डोळे दीपवून टाकेल. उत्तराखंड हे आपल्या सुंदर ठिकाणांसाठी आणि धार्मिक पर्यटनासाठी लोकप्रिय आहे. इथेच खुरपाताल हे सुंदर तलाव आहे. खुरपाताल हे सुंदर तलाव आहे जे नैनितालपासून 10 किलोमीटर अंतरावर वसले आहे. निसर्गसौंदर्याने वेढलेला हा तलाव तुमचा सर्व ताण दूर करू शकतो. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर तुम्ही या तलावाच्या काठावर बरेच तास घालवू शकता. या तलावाची खासियत म्हणजे हा तलाव रंग बदलत राहतो. होय, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. शेवाळामुळे या तलावाच्या पाण्याचा रंग बदलत राहतो.
Chaitra Navratri 2025: भारतातील सर्वात जुने दुर्गा मातेचे मंदिर; इथेच देवीने केला होता असुरांचा संहार
बोटिंगचा लुटता येईल आनंद
या अतिशय सुंदर तलावात तुम्ही बोटिंगचा आनंद लुटू शकता. या तलावाचे स्वच्छ पाणी पर्यटकांनाही आकर्षित करते. जर तुम्हाला साहसी उपक्रम करायला आवडत असतील तर तुम्ही येथे ट्रेकिंग आणि हायकिंगचाही आनंद घेऊ शकता. या तलावाचा आनंद लुटण्यासाठी उन्हाळा हा एक उत्तम ऋतू ठरू शकतो. व्यस्त जीवनातून थोडा ब्रेक घेऊन तुम्ही या तलावाला नक्कीच भेट देऊ शकता. इथे कुटुंबसोबत आणि प्रियजनांसोबत एक चांगला वेळ घालवता येईल.