Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kitchen Tips: उन्हाळ्यात घरात लाल मुंग्या वाढल्यात? मग करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

Tips To Control Red Ants In Kitchen: किचन ते बेडरुमपर्यंत, लाल मुंग्या वाढल्यात, मग हे सोपे घरगुती उपाय नक्की करुन पहा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 17, 2026 | 07:18 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • उन्हाळ्यात घरात लाल मुंग्या वाढल्यात?
  • मग करा ‘हे’ सोपे उपाय
  • मुंग्यांना ठेवतील दूर
उन्हाळा सुरू होताच प्रत्येक घरात एक सामान्य समस्या दिसून येते, ती म्हणजे लाल मुंग्याची रांग. कधी साखरेच्या डब्यात, कधी पिठाच्या तर कधीकधी जेवणाच्या ताटातही लाल मुंग्या शिरकाव करतात. एकदा का मुंग्या घरात शिरल्या की, त्या एक लांब रांग तयार करतात, ज्यामुळे त्यांना बाहेर काढणे कठीण होते. अनेकजण लाल मुंग्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल पावडरचा वापर करतात. परंतु, हे किचनमधील खाद्यपदार्थांसाठी लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांसाठी धोकादायक असू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही सोप्या घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत, जे मुंग्याना दूर ठेवण्यासाठी प्रभावी ठरतील.

Health Tips: भांडी चमकदार, पण स्पंज घाणेरडा? किचनमधील ‘ही’ चूक आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

व्हिनेगरचा वापर

लाल मुंग्यांपासून सुटका मिळवण्यासाठी व्हाइट व्हिनेगर हा सर्वात सोप्या आणि प्रभावी उपायांपैकी एक मानला जातो. मुंग्या फिरताना एक विशिष्ट गंध मागे सोडतात, ज्यामुळे त्याच मार्गावरील इतर मुंग्या आकर्षित होतात. व्हिनेगर हा गंध मिटवतो. त्यामुळे मुंग्या वाढत नाही. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये अर्धे पाणी आणि अर्धा व्हाइट व्हिनेगर मिसळा आणि ज्या ठिकाणी मुंग्या आहेत त्या ठिकाणी फवारा. दिवसातून एकदा किंवा दोनदा याचा वापर करा.

दालचिनीचे  पाणी

दालचिनीचा सुगंधांपासून लाल मुंग्या त्यापासून दूर राहतात. त्याच्या तीव्र वासामुळे मुंग्यांना आपला मार्ग बदलावा लागतो. मुंग्यांच्या वाटेवर किंवा बिळांच्या आसपास दालचिनीची पूड शिंपडल्याने मुंग्या येत नाही. याशिवाय, तुम्ही दालचिनीच्या तेलात भिजवलेले कापसाचे गोळेही ठेवू शकता.

लिंबाची साल

लिंबाचा आंबटपणा आणि तीव्र वास मुंग्यांना दूर ठेवण्यास मदत करतो. ज्या ठिकाणी मुंग्या दिसतात, त्या ठिकाणी लिंबाचा रस शिंपडा. याव्यतिरिक्त, लिंबाच्या सालीचे लहान तुकडे करून किचनच्या कोपऱ्यात ठेवल्यानेही मुंग्या दूर राहण्यास मदत होते. अनेक लोक फरशी पुसताना पाण्यात लिंबाचा रस मिसळूनही वापरतात.

मीठ आणि बेकिंग सोडा

मुंग्यांना दूर ठेवण्याचा एक सोपा उपाय म्हणून मीठाचाही वापर केला जातो. पाण्यात थोडे मीठ मिसळून ते मुंग्यांच्या लाइनमध्ये शिंपडा. काही लोक मिठात बेकिंग सोडा मिसळूनही वापरतात, ज्यामुळे मुंग्या त्या जागेतून निघून जातात.

पुदिना

मुंग्यांना पुदिन्याचा तीव्र वास आवडत नाही. त्यामुळे, ज्या ठिकाणी मुंग्या जास्त असेल त्या ठिकाणी पुदिन्याची पाने किंवा त्याचे तेल ठेवा. पाण्यात पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब मिसळून शिंपडणे देखील फायदेशीर ठरू शकते.

Parenting Tips: पालकांनो! मुलांना स्मार्ट आणि हुशार बनवायचंय? मग आजच करा ‘या’ गोष्टी

 

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Summer red ants home remedies kitchen tips marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 07:18 PM

Topics:  

  • Food Poison
  • kitchen tips
  • lifestyle news in marathi

संबंधित बातम्या

Air Fryer Tips: नवीन एअरफ्रायर घेतलाय? वापरण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या आवर्जून काळजी
1

Air Fryer Tips: नवीन एअरफ्रायर घेतलाय? वापरण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या आवर्जून काळजी

Teenage Parenting Tips:  Teenager मुलं आईवर ओरडतात? काय करायचं कळत नाही, ‘या’ टिप्स वाचाच!
2

Teenage Parenting Tips: Teenager मुलं आईवर ओरडतात? काय करायचं कळत नाही, ‘या’ टिप्स वाचाच!

World Bamboo Day: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? कधी झाली होती सुरूवात, मनोरंजक तथ्य
3

World Bamboo Day: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? कधी झाली होती सुरूवात, मनोरंजक तथ्य

International Equal Pay Day: पुरुषांपेक्षा अधिक मेहनत, पण तरीही महिलांना वेतन कमी; कधी कमी होणार अंतर
4

International Equal Pay Day: पुरुषांपेक्षा अधिक मेहनत, पण तरीही महिलांना वेतन कमी; कधी कमी होणार अंतर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.