Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? याची लक्षणे कोणती?
जेव्हा एखादे मूल प्रश्न विचारते, तेव्हा लगेच उत्तर देण्याऐवजी, त्यांना स्वतः विचार करण्याची संधी द्या. मुलांना आधी विचारा की त्यांना त्याबद्दल काय वाटते किंवा त्यांना किती माहिती आहे. असे केल्याने, मूल केवळ उत्तर पाठ करत नाही, तर विचार करण्याचा प्रयत्न करते. हळूहळू, त्यांची समजून घेण्याची आणि तर्क करण्याची क्षमता मजबूत होते. अनेकदा, मुले स्वतःच्या पद्धतीने उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात आणि या सवयीमुळे त्यांचे मन अॅक्टिव्ह राहते. जर पालकांनी प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर दिले, तर मुलामध्ये स्वतः विचार करण्याची सवय विकसित होणार नाही. म्हणूनच, मुलांना विचार करण्यासाठी वेळ देणे खूप महत्त्वाचे आहे.
आजकाल बहुतेक लोक मोबाईल फोन आणि टीव्हीमध्ये इतके व्यस्त असतात की ते आपल्या मुलांकडे पूर्ण लक्ष देऊ शकत नाहीत. पण दिवसातून फक्त १० मिनिटे जरी आपल्या मुलांसोबत घालवली, तरी त्याचा खूप सकारात्मक परिणाम होतो. आपल्या मुलांशी बोलताना, आपला मोबाईल बाजूला ठेवा, टीव्ही बंद करा आणि इतर कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करू नका. आपल्या मुलांचे बोलणे काळजीपूर्वक ऐका आणि त्यांना जाणीव करुन द्या की त्यांचे शब्द तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. जेव्हा मुलांना असे वाटते की, त्याचे पालक त्यांच्या गोष्टी ऐकतात आणि त्याला महत्व देतात, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो. यामुळे ते आपले विचार मोकळे पणाने मांडायलाही शिकतात. ही सवय त्यांच्या स्मरणशक्ती आणि मानसिक विकासासाठी उपयुक्त ठरते.
पालक अनेकदा आपल्या मुलांच्या चुका लगेच ओळखतात, पण अनेकदा त्यांचे कौतुक करायला विसरतात. मुलांचे दररोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी कौतुक केले पाहिजे. जर एखादे मूल एखाद्या कामात खूप मेहनत घेत असेल किंवा काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांची नक्कीच कौतुक करा. तुम्ही त्यांना सांगा की, ‘तू खूप चांगला प्रयत्न केलास’ किंवा ‘तुझ्या मेहनतीचे मला कौतुक आहे’. असे सकारात्मक शब्द मुलांना आतून आनंदी करतात. यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि ते भविष्यात अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करतात.
काही खेळ मुलांच्या बौद्धिक विकासाला प्रोत्साहन देतात. तुम्ही त्यांच्यासोबत बोर्ड गेम्स,चेस, सुडोकू, क्रॉसवर्ड आणि इतर बुद्धीला चालना देणारे खेळ खेळू शकता. यामुळे त्यांची निर्णयक्षमता, रिजनिंग स्कीन आणि ऑबजर्वेशलन स्कील्स सुधारतात. जी मानसिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.
Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत






