अभिनेता सुशांत शेलारने सांगितले वजन कमी करण्यामागचे कारण
प्रसिद्ध अभिनेता सुशांत शेलार नेहमीच त्याच्या अभिनयामुळे चर्चेत असतो. नुकतंच ‘धर्मवीर २’ चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे पुन्हा एकदा सुशांत शेलारच्या नावाची सगळीकडे मोठी चर्चा होताना दिसत आहे. बहुचर्चित ‘धर्मवारी २’ चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला. या सोहळ्याला सुशांत शेलारने हजेरी लावली होती. त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मधील सुशांतला पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. कारण सुशांतचे अचानक कमी झालेले वजन. यावर स्वतः सुशांतने उत्तर दिले आहे.
सुशांत म्हणाला, स्वामी कृपेने मला कोणताही आजार झालेला नाही. मी नवीन चित्रपट रानटी साठी वजन कमी केले आहे. आयुर्वेदिक डॉक्टर जयेश जाधव यांचा सल्ला घेऊन मी माझे वजन कमी केले आहे, असे सुशांत शेलार याने सांगितले आहे. पण डाईट फॉलो करताना फूड इन्फेक्शन झाल्याचे त्याचे स्पष्ट केले. ग्लुटन अॅलर्जीचे निदान झाले असून ग्लुटन अॅलर्जी म्हणजे काय? ग्लुटन अॅलर्जी झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसतात? जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
हे देखील वाचा: ओठांना बर्फ लावल्याने काय होते?
ग्लुटन अॅलर्जीमुळे आतड्यांच्या समस्या उद्भवतात. तसेच यामुळे सेलिआक रोगासह स्वयं-प्रतिकार सिंड्रोम होऊ शकतो. बाजारात मिळणाऱ्या आणि इतर अनेक पदार्थांमध्ये ग्लुटन आढळून येते. गहू, राई आणि बार्ली यांच्यासह अनेक पदार्थांमध्ये नैसर्गिक ग्लुटन असते. रोटाव्हायरस, सॅपोव्हायरस, ॲस्ट्रोव्हायरस इत्यादी विषाणू या अॅलर्जीमध्ये आढळून येतात. हे जिवाणू शरीरात शिरल्यानंतर आरोग्याचे नुकसान होण्यास सुरुवात होते.
हे देखील वाचा: ॲसिडिटीपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन,जळजळपासून मिळेल आराम