खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर हळूहळू आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. सतत तेलकट,तिखट पदार्थ खाल्यामुळे ॲसिडिटी, अपचन, गॅस इत्यादी समस्या उद्भवण्याची शक्यता असते. ॲसिडिटी किंवा अपचन झाल्यानंतर सतत ढेकर येणे, उलटी सारखं वाटणे, मळमळ होणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. त्यामुळे ॲसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी आहारात थंड पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला ॲसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
ॲसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी या पदार्थांचे सेवन करा
मागील अनेक वर्षांपासून कोरफड जेलचा वापर आरोग्य सुधारण्यासाठी केला जात आहे. कोरफडचा रस प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि ॲसिडिटीचा त्रास जाणवत नाही.
नारळ पाण्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स ॲसिडिटी कमी करण्यास मदत करतात. तसेच नारळ पाण्याचे सेवन केल्यामुळे हायड्रेशनला प्रोत्साहन मिळते आणि शरीर निरोगी राहते.
ॲसिडिटी झाल्यानंतर सफरचंद खावे. कारण यामध्ये असलेल्या फायबरमुळे पोटातील गॅस आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. पोटातील अतिरिक्त ॲसिड शोषून घेण्याचे काम सफरचंद करते.
बाजारात वर्षाच्या बाराही महिने काकडी उपलब्ध असते. काकडीचे सेवन केल्यामुळे शरीरात थंडावा मिळतो. तसेच काकडीमध्ये ९० टक्के पाणी असते. तसेच काकडीचे सेवन केल्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
ॲसिडिटी किंवा पोटामध्ये सतत जळजळ होत असल्यास थंड दूध प्यावे. थंड दूध प्यायल्यामुळे पोटामधील जळजळ कमी होऊन अपचन, गॅस इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो.