अशा पद्धतीने घ्या घरगुती उपाय करून ओठांची काळजी
थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्य आणि त्वचेसोबत ओठांची काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे. या दिवसांमध्ये वातावरणात गारवा असल्यामुळे त्वचेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्वचा ड्राय आणि कोरडी होऊन जाते. त्वचा ड्राय झाल्यानंतर चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स आणि इतर ब्युटी प्रॉडक्ट लावले जातात. थंडीच्या दिवसांमध्ये चेहऱ्याच्या त्वचेसोबतच ओठांची त्वचा सुद्धा खराब आणि कोरडी होऊन जाते. कोरड्या ओठांना काही लावलेनाहीतर ओठांमध्ये भेगा पडून रक्त येण्यास सुरुवात होते. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी महिला अनेक उपाय करतात. मात्र तरीसुद्धा ओठांची त्वचा व्यवस्थित होत नाही. थंड वातावरणामुळे आरोग्याला हानी पोहचते. शिवाय रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
ओठ फाटल्यानंतर ओठांना क्रीम्स किंवा इतर प्रॉडक्ट लावण्याऐवजी घरगुती पदार्थ लावावेत. घरगुती पदार्थ लावल्यामुळे ओठांची त्वचा मऊ आणि सॉफ्ट होऊन जाते. शिवाय ओठ चांगले होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला थंडीमुळे फाटलेले ओठ सुधारण्यासाठी ओठांना कोणते घरगुती पदार्थ लावावे, याबद्दल सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यामुळे ओठांची त्वचा मऊ आणि सॉफ्ट होण्यास मदत होईल. शिवाय घरगुती उपायांसोबतच तुम्ही आयुर्वेदिक उपायसुद्धा करू शकता. यामुळे ओठ चांगले होतील.
फाटलेल्या ओठांना तुम्ही तूप किंवा लोणी लावू शकता. यामुळे तुमचे ओठ सुंदर आणि मुलायम होतील. हिवाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये ओठांची व्यवस्थित काळजी घ्यावी. अन्यथा ओठ काळे दिसू लागतील. तूप ओठांवर नॅचरल मॉइश्चरायजरप्रमाणे काम करते. यामुळे ओठ मऊ आणि चमकदार होतात. थंडीमध्ये नियमित ओठांना तूप लावावे.
मधामध्ये आढळून येणाऱ्या गुणधर्मांमुळे ओठांवरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचा एक्सफॉलिट करण्यासाठी मदत करतात. तसेच यामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आढळून येतात. ओठांना मध लावल्यानंतर ५ ते १० मिनिटं ठेवून नंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाकावे. ज्यामुळे तुमचे ओठ कोरडे पडणार नाही.
त्वचेसंबंधित सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर केला जातो. यामध्ये असलेल्या अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे त्वचा चांगली होते. खोबरेल तेलाचे एक ते दोन थेंब घेऊन ओठांवर रात्रीच्या वेळी लावावे. यामुळे तेल ओठांमध्ये मुरेल आणि ओठ चांगले होतील.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
बदाम तेलात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. शिवाय त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळतो. एक ते दोन थेंब बदाम तेल घेऊन ओठांवर लावून ठेवावे. नंतर पाण्याने ओठ स्वच्छ धुवून घ्या.