उन्हाळ्यात या पद्धतीने घ्या तेलकट त्वचेची काळजी
राज्यभरात सगळीकडे उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे आरोग्यासह त्वचेसुद्धा योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळा वाढल्यानंतर त्वचा अधिक तेलकट आणि चिकट होऊन जाते. त्वचा तेलकट आणि चिकट झाल्यानंतर योग्य वेळी स्वच्छ केली नाहीतर चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरुमांचे फोड येऊ लागतात. त्यामुळे उन्हाळ्यात स्किन केअर रुटीनमध्ये बदल करून त्वचेला सूट होतील असे प्रॉडक्ट वापरावे. त्वचा तेलकट झाल्यानंतर चेहऱ्यावर अतिरिक्त तेल दिसू लागते. यामुळे मेकअप केल्यानंतर सुद्धा त्वचा तेलकट दिसू लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात तेलकट त्वचेची कशी काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पद्धतीने त्वचेची काळजी घेतल्यास चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरुमांचे फोड येणार नाहीत.(फोटो सौजन्य – iStock)
टॅनिंग- ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी चमचाभर कॉफीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, चेहरा होईल ग्लोइंग चमकदार
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये त्वचा कोमट पाण्याने धुवावी. यामुळे त्वचेमधील धूळ, माती स्वच्छ होते. कोमट पाण्याने त्वचा धुतल्यामुळे त्वचेचे नुकसान होत नाही. त्यामुळे नेहमी कोमट पाण्यानेच चेहरा स्वच्छ करावा.
दिवसभरातून दोनदाच चेहरा स्वच्छ धुवावा. चेहरा सतत पाण्याने स्वच्छ करू नये. कारण सतत चेहरा धुतल्यामुळे त्वचेमधील नैसर्गिक तेल निघून जाते आणि चेहरा कोरडा आणि रुक्ष पडतो. दोन वेळा पेक्षा जास्त वेळ चेहरा धुतल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेवर जास्त मेकअप करू नये. जास्त मेकअप केल्यामुळे त्वचा अधिक कोरडी होऊन जाते. याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मेकअप योग्य वेळी काढला नाहीतर त्वचेमध्ये मेकअप तसाच राहतो आणि पिंपल्स, फोड, मुरूम येण्याची शक्यता असते. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त हेवी फाउंडेशनचा वापर करणे टाळावे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा घरगुती पदार्थांचा वापर करून बनवलेला फेसपॅक त्वचेवर लावावा. यामुळे त्वचेमधील अतिरिक्त तेल नियंत्रणात राहते आणि त्वचा जास्त तेलकट दिसत नाही. त्वचा चमकदार ठेवण्यासाठी बनाना हनी फेसपॅकचा वापर करावा.
अतिशय तेलकट त्वचा असलेल्या महिलांनी अॅपल हनी फेसपॅकचा वापर करावा. यामुळे त्वचेमधील अतिरिक्त तेल कमी होईल आणि त्वचा अधिक सुंदर आणि उठावदार दिसू लागेल.