त्वचेसाठी 'या' पद्धतीने बनवा कॉफीचा वापर:
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यासह त्वचेवर लगेच दिसून येतो. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होते. त्वचेमध्ये सतत काहींना काही बदल होत असतात. थंडी सुरु झाल्यानंतर त्वचा निस्तेज, रुक्ष, कोरडी आणि काळवंडलेली दिसू लागते. मात्र अनेक महिला त्वचेमध्ये होणाऱ्या या बदलांकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे त्यांची त्वचा अधिक खराब होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्वचेवर झालेले टॅनिंग घालवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या क्रीम लावल्यानंतर काहीकाळ त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसते. मात्र कालांतराने पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते.(फोटो सौजन्य – iStock)
तळपायाच्या भेगा कमी होत नसल्यास करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, पाय होतील मुलायम आणि सुंदर
त्वचेमध्ये होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्वचेवर वाढलेले टॅनिंग आणि डेड स्किन कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम्स वापरण्यापेक्षा घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थ त्वचेसाठी अधिक प्रभावी ठरतात. ज्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारते आणि चेहऱ्याला अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला त्वचेवरील टॅनिंग आणि डेड स्किन कमी करण्यासाठी कॉफीचा वापर कशाप्रकारे करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
चेहऱ्यावरील डेड स्किन कमी करण्यासाठी तुम्ही कॉफीचा वापर करू शकता. यासाठी वाटीमध्ये कॉफी पावडर घेऊन त्यात मध आणि खोबऱ्याचे तेल मिक्स करून घ्या. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर चेहरा ओला करून लावून घ्या. ५ मिनिटं झाल्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी होईल आणि त्वचा उजळदार दिसू लागेल. त्यानंतर २ मिनिटं ठेवून चेहरा नंतर पाण्याने स्वच्छ करून घ्या. यामुळे त्वचा अधिक मऊ आणि मुलायम होईल.
चष्मीश मित्रहो! चष्म्याचा कंटाळा आलाय? सकाळसकाळी ‘हा’ पदार्थ मिसळून प्या गरम पाणी
टॅनिंगमुळे खराब झालेली त्वचा पुन्हा सुधारण्यासाठी वाटीमध्ये कॉफी पावडर घेऊन त्यात ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा. 5 मिनिटं ठेवून नंतर हलक्या हाताने संपूर्ण चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे डेड स्किन निघून येईल आणि त्वचा अधिक सुंदर आणि उठावदार दिसेल. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.