हिवाळ्यात 'अशा' पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी
राज्यभरात सगळीकडे हलक्या स्वरूपाच्या थंडीला सुरुवात झाली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात गारवा आणि सगळीकडे धुक्यांची चादर पसरलेली असते. तसेच या दिवसांमध्ये उन्हाच्या उकाड्यापासून सगळ्यांचं आराम मिळतो. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. थंडी चालू झाल्यानंतर सगळीकडे रोगराई पसरू लागते. शिवाय या दिवसांमध्ये साथीचे आजार वेगाने पसरतात. त्यामुळे थंडी चालू झाल्यानंतर जीवनशैलीमध्ये आणि खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये बदल करणे आवश्यक आहे.
थंडी चालू झाल्यानंतर वातावरणात गारवा असतो. या गारव्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होऊन जाते.शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर आजारपण वाढू लागते. या दिवसांमध्ये डेंग्यू, मलेरिया, फ्लू, ताप, सर्दी, खोकला हे आजार वाढू शकतात. त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन जीवन जगले पाहिजे. थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे, पोषण आहार आणि विश्रांतीची आवश्यकता असते. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी कशा पद्धतीने घ्यावी, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: हिवाळ्यामध्ये कुटुंबाला ठेवा निरोगी; ‘हे’ ५ स्वस्त ड्राय फ्रूट्स खाणे फायदेशीर ठरेल
हिवाळ्यामध्ये साथीचे आजार वाढण्याची शक्यता असते. तसेच रात्रीच्या वेळी वातावरणात थंडावा असतो. त्यामुळे रात्री झोपताना किंवा दिवसाच्या वेळी उबदार कपडे परिधान करावे. ज्यामुळे शरीराचे थंडीपासून नुकसान होणार नाही. शिवाय हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वेटर किंवा इतर थंडीपासून बचाव करणारे कपडे परिधान करावे.
थंडीच्या दिवसांमध्ये रात्रीच्या वेळी किंवा इतर वेळी गरम अन्नपदार्थ जेवण्याचा प्रयत्न करावा. गरम आणि पौष्टिक अन्नपदार्थ खाल्यामुळे शरीराला योग्य ते पोषण मिळण्यास मदत होते. गरम पाणी, सूप, गरम दूध किंवा गरम अन्नाचे सेवन करावे. तसेच हिवाळ्यात जास्त बाहेरच्या पदार्थांचे सेवन केल्यास आजारी पडण्याची शक्यता असते.
सर्वच ऋतूंमध्ये शरीर हायड्रेट ठेवणे फार गरजेचे आहे. उन्हाळ्यात जशी शरीराला पाण्याची आवश्यकता असते, तशीच आवश्यकता हिवाळ्यात सुद्धा असते. त्यामुळे पाण्याचे भरपूर सेवन करावे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर आजारांपासून दूर राहते.
थंडीपासून बचाव करण्यासाठी रात्री झोपताना जाडसर चादर वापरावी. यामुळे सर्दी, खोकला किस्वा इतर आजार होणार नाहीत. हिवाळ्यात तापमान कमी होत जाते. कमी झालेल्या तापमानाचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.
हे देखील वाचा: धूम्रपान सोडायचा विचार करताय? फॉलो करा ‘या’ टिप्स
थंडीच्या दिवसांमध्ये कुलरचा वापर करू नये. यामुळे थंडी आणखीन वाढण्याची शक्यता असते. जास्त थंड वातावरणात राहिल्यामुळे सर्दी, खोकला, ताप आणि इतर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री झोपताना पंख्याच्या हवेचा वापर करावा. पण तापमानात घट झाल्यास पंखा किंवा कुलर वापरू नये.