फोटो सौजन्य - Social Media
धूम्रपान टाळणे फार कठीण आहे. परंतु, धूम्रपान करणे आजकाल सोपे झाले आहे. अनेक जणांच्या तोंडाला आजकाल सिगरेट असते. त्याला सोडवणे फार कठीण असले तरी अशक्य नाही. अशा अनेक पद्धती आहेत, ज्यांचे अनुसरण करून आपण या वाईट सवयीला टाळू शकतो. सिगरेटमध्ये असलेले निकोटीन आपल्या शरीरासाठी फार महत्वाचा असतो. आपल्या डोक्यामध्ये याचा प्रवाह गेल्याने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्यास सुरुवात होतात. याने डोक्यामध्ये डोपामाइन तयार होतो आणि आनंदाची भावना तयार होते. याला वेळीच आळा घालणे गरजेचे असते. चला तर मग जाणून घेऊयात, धूम्रपानाची वाईट सवय सोडण्याचे टिप्स.
हे देखील वाचा : Recipe: बटाट्याची साल फेकू नका तर त्यापासून बनवा हा कुरकुरीत स्नॅक्स
आपण एखादी गोष्ट सोडतोय? याचे कारण आपल्याला माहिती असले तर आपण आपल्या ध्येयाला लगेच प्राप्त करू शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार धूम्रपान टाळण्यास सुरुवात करा. विविध क्लासेस तसे कौन्सिलिंगच्या आधारे धूम्रपान सोडवता येते. जेव्हा केव्हा तुम्हाला निकोटीनची लालसा जाणवेल तेव्हा तुम्ही निकोटीन रिप्लेसमेंट गम, लोझेंजेस, पॅचेस वापरू शकता. याशिवाय तुमच्या कुटुंबियांची आणि मित्रांची मदत घ्या. त्यांचा आधार घ्या. यामुळे प्रेरणा मिळेल आणि व्यसन लवकर निघून जाईल. धूम्रपान ही अशी गोष्ट आहे जी लवकर सुटत नाही. हि हळुवार सुटते त्यासाठी प्रयत्नही हळुवार केली पाहिजे. आपण दररोज जितके सिगरेट पीत आहात त्याची संख्या दररोज कमी करत चला. या संख्येत येणारी कमतरता एके दिवशी आपल्या धूम्रपानाचे प्रमाण कमी करेल आणि आपण या सवयींपासून मुक्त होण्यास यश मिळवू. चला या गोष्टी विस्ताराने जाणून घेऊयात.
१. धूम्रपान सोडण्याचे कारण शोधा
आपण एखादी गोष्ट सोडताना त्याचे कारण शोधणे अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्याला धूम्रपान का सोडायचे आहे, हे समजले तर आपल्या ध्येयाला साध्य करणे सोपे जाते. आपल्या आरोग्याच्या भल्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी, आर्थिक बचत किंवा स्वतःला नवीन दिशा देण्यासाठी तुम्ही धूम्रपान सोडू शकता.
२. डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या
धूम्रपान सोडण्यासाठी डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे अत्यंत उपयुक्त ठरते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही विविध उपचार पद्धती, कौन्सिलिंग सेशन्स, तसेच निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीचा वापर करू शकता. निकोटीन गम, लोझेंजेस किंवा पॅचेसच्या मदतीने तुमची निकोटीनची तलफ काही प्रमाणात कमी होऊ शकते.
३. कौन्सिलिंग आणि सपोर्ट ग्रुपचा आधार घ्या
धूम्रपान सोडण्यासाठी कौन्सिलिंग आणि सपोर्ट ग्रुप अत्यंत प्रभावी ठरू शकतात. अशा ग्रुपमध्ये सामील होऊन तुमच्या अनुभवांची चर्चा करा आणि इतरांच्या अनुभवांमधून प्रेरणा घ्या. मित्र आणि कुटुंबीयांच्या मदतीने धूम्रपान सोडणे सोपे जाते. ते तुमच्या ध्येयात तुमची साथ देतील, त्यामुळे मानसिक आधार मिळेल आणि धूम्रपान सोडण्याची प्रेरणा वाढेल.
हे देखील वाचा : काय असते BEFAST ? जाणून घ्या, स्ट्रोकची लक्षणे आणि उपाय
४. हळूहळू कमी करा
धूम्रपान सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, एकदम सोडण्याऐवजी दररोज थोडीशी कमी करा. रोज पिणाऱ्या सिगारेटची संख्या हळूहळू कमी करत जा. अशा प्रकारे दररोज कमी केल्यास शरीरावर कमी दुष्परिणाम होईल आणि तुम्हाला या सवयीपासून मुक्त होण्यास मदत मिळेल.
५. ध्यान आणि योगाचा अवलंब करा
ध्यान आणि योगाच्या मदतीने मन शांत ठेवता येते, ज्यामुळे धूम्रपानाची तलफ नियंत्रित करण्यास मदत होते. नियमित व्यायाम केल्याने शरीरातील ताण कमी होतो आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो.
६. निकोटीनची गरज वाटल्यास चघळण्याचे पर्याय वापरा
जेव्हा तुम्हाला धूम्रपानाची ओढ लागेल, तेव्हा चघळण्याचा एक पर्याय निवडा. गम, बदाम, अखरोट, किंवा सुकलेला गाजर चघळल्याने निकोटीनची गरज काही प्रमाणात कमी होते.
७. दृढनिश्चय ठेवा आणि ध्येय साध्य करा
धूम्रपान सोडण्यासाठी ठाम निश्चय हवा. शारीरिक, मानसिक आणि भावनिक पातळीवर प्रयत्न करत राहिल्यास आपण नक्कीच यशस्वी होऊ शकता.
धूम्रपान सोडणे कठीण वाटत असले तरी, दृढनिश्चय आणि योग्य मार्गदर्शन घेतल्यास आपण या सवयीपासून मुक्त होऊ शकतो.