Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोशल मीडियाच्या अतिवारापामुळे मानसिक आरोग्य धोक्यात! Mental Health ची काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

ताणतणावावर मात करण्यासाठी योग्य आहार, सकारात्मक विचार आणि मनाला विश्रांती देणे आवश्यक आहे. योग, विपश्यना, ध्यानधारणा, आवडता खेळ किंवा छंद जोपासल्यास ताण कमी होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 03, 2026 | 10:56 AM
सोशल मीडियाच्या अतिवारापामुळे मानसिक आरोग्य धोक्यात!

सोशल मीडियाच्या अतिवारापामुळे मानसिक आरोग्य धोक्यात!

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आरोग्यावर होणारे परिणाम?
मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपाय?
सोशल मिडियाचा अतिवापर केल्यास होणारे परिणाम?

आजचे युग हे प्रचंड स्पर्धेचे आणि धकाधकीच्या जीवनशैलीचे बनले आहे. शहरात राहण्याचा ताण, लहान कुटुंबपद्धती, वाढते ईएमआयचे हप्ते, नोकरी-व्यवसायातील अस्थिरता यामुळे प्रत्येक व्यक्ती मानसिक तणावाखाली जगत आहे. जीवन जगणेच जणू एक स्पर्धा बनली असून प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार या ताणाला सामोरे जात आहे. अनेक जण ताणतणावावर मात करतात, मात्र काही व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याने त्यांच्या क्षमतेपेक्षा आरत्या वाणसामध्थाला ‌की होतमानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, असे मानसोपचार विभागप्रमुख डॉ. निशिकांत थोरात यांनी नोंदवले आहेत.(फोटो सौजन्य – istock)

चवदार म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या ‘या’ पदार्थांमुळे वाढतो कॅन्सरचा धोका, दैनंदिन आहारात चुकूनही करू नका सेवन

ताणतणावामुळे डिप्रेशन, अ‍ॅन्झायटी, स्ट्रेस यांसारखे मानसिक आजार वाढत असून त्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावरही होत आहे. मधुमेह, उच्च्च रक्तदाब यांसारखे आजार तसेच टोकाच्या परिस्थितीत आत्महत्येसारखे प्रकार घडताना दिसत आहेत. कौटुंबिक समस्या, आर्थिक अडचणी आणि नातेसंबंधातील ताण यांचाही यामध्ये मोठा वाटा आहे.

गेल्या वर्षभरात समाजात, विशेषतः तरुणांमध्ये आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येही अशा घटना घडत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर तरुणांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. ससून रुग्णालयातील मनोविकारशास्त्र विभागाच्या व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या तरुणांमध्ये अल्कोहोल, गांजा, अफू यांसारख्या पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात आढळून येते. महाविद्यालयीन विद्याथ्यर्थ्यांमध्ये तंबाखू, सिगारेट तसेच उत्तेजक द्रव्यांचे सेवन वाढले आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णांमध्ये गांज्याचे व्यसन सर्वाधिक असल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले तरुण वयात मद्यपान आणि महागड्या अमली पदार्थांचे सेवन वाढत असून यामुळे कुटुंब आणि समाजाचे मोठे नुकसान होत आहे. एमडीसारखी औषधे महाग असून ती मिळवण्यासाठी तरुण घरातून पैसे मागतात किंवा सहज उपलब्ध होणाऱ्या मोबाईल अॅप्सद्वारे कर्ज घेतात. यातील धोके लक्षात न आल्याने ते कर्जबाजारी होतात आणि पुढे गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता वाढते.

मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी:

ताणतणावावर मात करण्यासाठी योग्य आहार, सकारात्मक विचार आणि मनाला विश्रांती देणे आवश्यक आहे. योग, विपश्यना, ध्यानधारणा, आवडता खेळ किंवा छंद जोपासल्यास ताण कमी होतो. आठवड्‌यातून किमान एक दिवस स्वतःसाठी वेळ देणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जसे शारीरिक आरोग्याची काळजी घेतली जाते तसेच मानसिक आरोग्यालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. मित्रांशी मनमोकळा संवाद, नातेसंबंध जपणे आणि दररोज किमान आठ तासांची झोप मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

जपानच्या लोकांचे आयुष्य दीर्घ कसे? काय आहेत त्यांच्या सवयी? जाणून घ्या

सोशल मिडियाचा अतिवापर टाळावा:

त्याचबरोबर सोशल मीडियाचा अति वापर टाळणे गरजेचे आहे. इतरांच्या यशाची, सुखसोयीची तुलना केल्याने मनावर नकळत परिणाम होतो आणि न्यूनगंड निर्माण होतो. यापेक्षा आपल्याकडे काय आहे आणि ते अधिक चांगले कसे करता येईल यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी जागरूकता आणि सकारात्मक जीवनशैली ही काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मानसिक आरोग्य म्हणजे काय?

    Ans: तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे एकंदरीत भावनिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाशी संबंधित आहे, जे विचार, भावना आणि कृतींवर परिणाम करते.

  • Que: मानसिक आरोग्याच्या समस्यांची सामान्य लक्षणे कोणती आहेत?

    Ans: सततची काळजी किंवा भीती, नैराश्य, अपराधीपणाची भावना, झोपेत बदल (जास्त किंवा कमी), भूकेत बदल, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, सामाजिक परिस्थितीतून दूर राहणे.

  • Que: मानसिक आरोग्याच्या समस्यांची कारणे काय असू शकतात?

    Ans: अनुवांशिक घटक, मेंदूला झालेली दुखापत, बालपणीचे वाईट अनुभव.

Web Title: Excessive use of social media puts mental health at risk follow these tips to take care of your mental health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • mental health
  • Mental Illness

संबंधित बातम्या

Green Tea पिऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ रिफ्रेशिंग पेयांनी करा दिवसाची आनंदी सुरुवात, शरीराला होतील फायदे
1

Green Tea पिऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ रिफ्रेशिंग पेयांनी करा दिवसाची आनंदी सुरुवात, शरीराला होतील फायदे

बेंबी सरकल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय
2

बेंबी सरकल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय

आईच्या गर्भाशयात बाळ नऊ महिने का राहते? जाणून घ्या मनुष्याला जन्म घ्यायला 9 महिना का लागतात
3

आईच्या गर्भाशयात बाळ नऊ महिने का राहते? जाणून घ्या मनुष्याला जन्म घ्यायला 9 महिना का लागतात

आईच्या किडनीदानातून मुलाला मिळाले नवजीवन! ससून रुग्णालयात प्रत्यारोपण यशस्वी; मातृत्वाच्या त्यागाचे जिवंत उदाहरण
4

आईच्या किडनीदानातून मुलाला मिळाले नवजीवन! ससून रुग्णालयात प्रत्यारोपण यशस्वी; मातृत्वाच्या त्यागाचे जिवंत उदाहरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.