Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Liver Disease मुळे अभिनेत्याच्या शरीराचा झाला सांगाडा, 44 व्या वर्षी निधन; तरुणपणीच यकृत सडल्यास शरीरात दिसतात ही लक्षणं

Liver Disease Symptoms : तामिळ अभिनेता अभिनय किंगर याचे निधन झाले असून बऱ्याच काळापासून तो यकृताच्या आजाराला झुंज देत असल्याची माहिती आली. हा आजार सातत्याने वाढत चालला असून वेळीच याची लक्षणे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 11, 2025 | 12:23 PM
Liver Disease मुळे अभिनेत्याच्या शरीराचा झाला सांगाडा, 44 व्या वर्षी निधन; तरुणपणीच यकृत सडल्यास शरीरात दिसतात ही लक्षणं

Liver Disease मुळे अभिनेत्याच्या शरीराचा झाला सांगाडा, 44 व्या वर्षी निधन; तरुणपणीच यकृत सडल्यास शरीरात दिसतात ही लक्षणं

Follow Us
Close
Follow Us:
  • अभिनय किंगर याचे 44 वर्षी निधन
  • यकृताच्या गंभीर आजाराला देत होता झुंज
  • यकृताच्या आजाराची लक्षणे आणि मुख्य कारणे जाणून घ्या
सोमवारी तामिळ अभिनेता अभिनय किंगर याचे निधन झाले आहे. अवघ्या 44 वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. माहितीनुसार, अभिनय हा अनेक वर्षांपासून यकृताच्या गंभीर आजाराला झुंज देत होता, त्याच्यावर बऱ्याच काळापासून उपचार सुरु असून मागील काही महिन्यात त्याची तब्येत फारच खालावली. त्याने आपल्या आजाराबद्दल उघडपणे सांगितले होते की, “मला माहित नाही की मी येथे किती काळ राहीन. डॉक्टरांनी सांगितले आहे की माझ्याकडे फक्त दीड वर्ष शिल्लक आहेत.” या आजारामुळे अभिनयचे बरेच वजन कमी झाले, त्याचे शरीर कमकुवत आणि कोमेजले होते. त्याचा आजार वाढत असताना त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, म्हणून त्याने त्यांच्या उपचारांसाठी लोकांना मदत करण्याचे आवाहन केले होते.

रात्री झोपण्याआधी दुधात मिक्स करून प्या ‘हा’ पौष्टीक पदार्थ, शांत झोप लागल्यासोबतच आठवडाभरात चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

यकृत रोग म्हणजे काय?

यकृत हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. तो रक्त शुद्ध करतो, पचनास मदत करतो, आवश्यक पोषक तत्वांचा साठा करतो आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो. यकृताच्या आजारामुळे यकृताचे कार्य योग्यरित्या थांबू शकते किंवा त्याची रचना खराब होऊ शकते. यकृताच्या आजारांमध्ये फॅटी लिव्हर , हिपॅटायटीस ए, बी, सी आणि ई, सिरोसिस, लिव्हर फायब्रोसिस, लिव्हर फेल्युअर, लिव्हर कॅन्सर आणि ऑटोइम्यून लिव्हर डिसीज यांचा समावेश होतो.

यकृताच्या आजाराची मुख्य कारणे

अति मद्यपान: जास्त आणि दीर्घकाळापर्यंत दारू पिणे हे यकृताच्या आजाराचे एक प्रमुख कारण आहे, ज्यामुळे फॅटी लिव्हर, अल्कोहोलिक हेपेटायटीस आणि सिरोसिस सारखे आजार होऊ शकतात.
विषाणू संसर्ग: हेपेटायटीस व्हायरस (ए, बी, सी) यकृताला संक्रमित करून जळजळ निर्माण करतात, ज्यामुळे यकृताचे कार्य बिघडते. हे विषाणू रक्त, वीर्य किंवा दूषित अन्न-पाण्याद्वारे पसरू शकतात.
लठ्ठपणा: वाढलेले वजन आणि लठ्ठपणा हे यकृतामध्ये चरबी जमा होण्याचे एक प्रमुख कारण आहे, ज्यामुळे यकृताचे नुकसान होऊ शकते.
मधुमेह: मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये यकृताच्या आजारांचा धोका अधिक असतो.
औषधे: काही विशिष्ट औषधांचा (विशेषतः डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेल्या) अतिवापर किंवा जास्त डोस यकृतासाठी हानिकारक ठरू शकतो.

यकृताच्या आजाराची लक्षणे

  • थकवा आणि अशक्तपणा
  • भूक न लागणे
  • मळमळ आणि उलट्या
  • पोटदुखी आणि सूज येणे
  • कावीळ किंवा गडद रंगाची लघवी
  • खाज सुटणे
  • वजन कमी होणे
  • पायांना सूज येणे
यकृताच्या आजाराचा धोका कोणाला जास्त असतो?

हाय कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, लठ्ठ असलेली लोक आणि दररोज मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये यकृताच्या आजाराचा धोका सर्वाधिक असतो. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणाऱ्या, यकृताच्या आजाराचा कुटुंबातील इतिहास असलेल्या, विषारी रसायनांच्या संपर्कात येणाऱ्या, कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या, खूप गोड किंवा तळलेले अन्न खाणाऱ्या आणि धूम्रपान करणाऱ्या लोकांमध्येही यकृताच्या आजाराचा धोका जास्त असतो.

बद्धकोष्ठतेमुळे पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? उपाशी पोटी नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन, आतड्यांमध्ये चिकटलेली घाण होईल साफ

यकृत रोग रोखण्याचे मार्ग

  • यकृत निरोगी ठेवण्यासाठी काही हेल्दी गोष्टींचे तुम्हाला अनुकरण करावे लागेल
  • वजन नियंत्रित ठेवा
  • मद्यपानाचे सेवन कमी अथवा पूर्णपणे बंद करा
  • फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि निरोगी चरबीयुक्त आहाराचे सेवन करा
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका
  • स्वच्छतेची काळजी राखा
  • जंक फूड आणि जास्त साखरेचे सेवन टाळा
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Tamil actor abhinay kinger dies due to liver disease know the causes and symptoms lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 12:23 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • Liver

संबंधित बातम्या

हार्ट अटॅकच्या येण्याच्या 45 तासांआधी शरीर देतं महत्त्वाचे इशारे; वेळीच ओळखा अन् स्वतःचा जीव वाचवा!
1

हार्ट अटॅकच्या येण्याच्या 45 तासांआधी शरीर देतं महत्त्वाचे इशारे; वेळीच ओळखा अन् स्वतःचा जीव वाचवा!

Reproductive Health: नोकरी करणारी 60% जोडपी टाळतात प्रजनन आरोग्याची तपासणी, गर्भधारणेच्या समस्यांमध्ये होतेय वाढ
2

Reproductive Health: नोकरी करणारी 60% जोडपी टाळतात प्रजनन आरोग्याची तपासणी, गर्भधारणेच्या समस्यांमध्ये होतेय वाढ

लैंगिक व प्रजनन आरोग्य जागरूकता दिन 2026: सुदृढ भविष्याकरिता घ्या प्रजनन आरोग्याची काळजी, काय सांगतात तज्ज्ञ
3

लैंगिक व प्रजनन आरोग्य जागरूकता दिन 2026: सुदृढ भविष्याकरिता घ्या प्रजनन आरोग्याची काळजी, काय सांगतात तज्ज्ञ

ते रहस्यमय तलाव जिथे जातच जिवंत जीव बनतो दगड, लालभडक आहे पाणी… याचे गूढ अजून वैज्ञानिकांनाही उलगडले नाही
4

ते रहस्यमय तलाव जिथे जातच जिवंत जीव बनतो दगड, लालभडक आहे पाणी… याचे गूढ अजून वैज्ञानिकांनाही उलगडले नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.