बद्धकोष्ठतेमुळे पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? उपाशी पोटी नियमित करा 'या' पदार्थांचे सेवन
बद्धकोष्ठता होण्याची कारणे?
आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय?
पोटात साचून राहिलेल्या विषारी घटकांचा शरीरावर काय परिणाम होतो?
दैनंदिन आहारात होणाऱ्या बदलांमुळे आणि जंक फूडच्या अतिसेवनामुळे कायमच बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. बद्धकोष्ठता झाल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही. आतड्यांमध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात, ज्यामुळे ऍसिडिटी, पोटात दुखणे, गॅस, अपचन इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. पोटाच्या समस्या उद्भवल्यानंतर केवळ पचनसंस्था नाहीतर संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे संपूर्ण दिवस खराब जातो. यामुळे दिवसभर पोट फुगलेले राहते, पोटात जडपणा जाणवतो इत्यादी अनेक समस्या वाढून शरीराला हानी पोहचते. डोकेदुखी, आतड्यांमध्ये जळजळ आणि मूळव्याध इत्यादी पचनसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीराचे नुकसान होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी उपाशी पोटी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ पचनक्रिया सुधारतात आणि शरीरासाठी प्रभावी ठरतात.(फोटो सौजन्य – istock)
बद्धकोष्ठता म्हणजे आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी खूप जास्त वेळ लागणे. बद्धकोष्ठता, किंवा आतड्यांमध्ये घाण साचल्यामुळे शरीराला कोणत्याही गंभीर आजाराची लागण होऊ शकते. याशिवाय लिव्हर आणि किडनी निकामी होण्याची शक्यता असते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरिया नष्ट करून टाकतात. यामुळे शरीरात इतर रोगांचा विकास झपाट्याने होतो.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी उपाशी पोटी त्रिफळा पावडरचे सेवन करावे. यासाठी पाणी गरम करून त्यात त्रिफळा पावडर मिक्स करून घ्या. तयार केलेल्या मिश्रणाचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये चिकटलेला मल बाहेर पडून जाईल आणि पोट स्वच्छ होईल. तसेच यामध्ये तुम्ही आवळा, हरद आणि बहेडा इत्यादी पदार्थांचा सुद्धा वापर करू शकता. त्रिफळा पावडरच्या सेवनामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्यासोबतच पचनक्रिया सुधारते, शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येतात. पण गर्भवती महिलांनी त्रिफळा पावडरचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाण्यात अंजीर आणि मनुका पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर पाण्याचे सेवन करून अंजीर आणि मनुका चावून खा. यामुळे बद्धकोष्ठता कमी होण्यासोबतच शरीराला भरमसाट फायदे होतील. तसेच अनेकांना दुधात मनुका किंवा अंजीर टाकून खायला खूप जास्त आवडते. यामुळे आतड्यांमधील अतिशय कठीण मल बाहेर पडून जातो आणि पोट स्वच्छ होते. सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ झाल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो.
Ans: बद्धकोष्ठता म्हणजे आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळा शौचास होणे. यात शौच कठीण, कोरडे होणे आणि शौचास ताण येणे यांसारख्या समस्या येतात.
Ans: बद्धकोष्ठतेची अनेक कारणे आहेत, ज्यात आहारातील फायबरची कमतरता, भरपूर पाणी न पिणे, शारीरिक हालचालींचा अभाव, आहाराच्या सवयींमध्ये बदल आणि काही औषधांचा वापर यांचा समावेश आहे.
Ans: पुरेशी पाणी प्या. फायबरयुक्त पदार्थ खा. नियमित व्यायाम करा.






