Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tanishq Launches Adhyantara Jewellery: तनिष्कचे नवे ‘अध्यंतरा’ कलेक्शन, आधुनिक भारतीय स्त्रीच्या विविध रूपांना समर्पित

Tanishq Launches Adhyantara Jewellery: तनिष्कने धनत्रयोदशीच्या निमित्ताने ‘अध्यंतरा’ हे नवीन ज्वेलरी कलेक्शन लाँच केले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री तृप्ती डिमरी या कलेक्शनच्या विशेष कॅम्पेनमध्ये झळकत आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 15, 2026 | 11:52 AM
Tanishq Launches Adhyantara Jewellery: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Tanishq Launches Adhyantara Jewellery: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • तनिष्कने धनत्रयोदशीसाठी ‘अध्यंतरा’ ज्वेलरी कलेक्शन लाँच
  • अभिनेत्री तृप्ती डिमरी या कलेक्शनच्या कॅम्पेनमध्ये झळकत
  • कलेक्शनची प्रेरणा ब्रह्मांडाचे सौंदर्य आणि खगोलीय आकृत्या
भारतातील सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रँड, तनिष्कने धनत्रयोदशीच्या पावन मुहूर्तासाठी आपले नवीन आणि अतिशय देखणे ज्वेलरी कलेक्शन ‘अध्यंतरा’ लाँच केले आहे. या नवीन कलेक्शनसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष कॅम्पेनमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री तृप्ती डिमरी झळकत आहे. ‘अध्यंतरा’ हे कलेक्शन अथांग ब्रह्मांडाच्या अद्भूत सौंदर्याने आणि त्याच्या गूढ रहस्यांनी प्रेरित आहे. तनिष्कचे असे मानणे आहे की, या जगातील प्रत्येक स्त्री स्वतःमध्ये इतकी विलक्षण आणि सुंदर आहे की, हे अथांग विश्वसुद्धा तिच्या आंतरिक शक्ती आणि सौंदर्यापासून प्रेरणा घेते. म्हणूनच, या कलेक्शनच्या माध्यमातून तनिष्कने विश्वाचे ते सर्व अद्भूत सौंदर्य दागिन्यांच्या रूपात गुंफून स्त्रीच्या अधिक जवळ आणले आहे.

लखलखत्या आणि जादुई दृश्यात्मक

प्रसिद्ध अभिनेत्री तृप्ती डिमरीसह चित्रित करण्यात आलेले कॅम्पेन या सुंदर संकल्पनेला एका लखलखत्या आणि जादुई दृश्यात्मक दुनियेच्या माध्यमातून पडद्यावर जिवंत करते. यात हे देखणे दागिने आणि त्यांची खगोलीय प्रेरणा एकमेकांमध्ये अत्यंत नैसर्गिकरीत्या एकरूप होऊन जातात. हे कलेक्शन सादर करण्याची तिची अनोखी शैली त्या स्त्रीचा आत्मविश्वास, तिचे वेगळेपण आणि तिचा आधुनिक दृष्टिकोन अचूकपणे प्रतिबिंबित करते, जिला डोळ्यांसमोर ठेवून या ‘अध्यंतरा’ कलेक्शनला एक सुंदर आकार देण्यात आला आहे. Tanishq Launches Adhyantara Jewellery:

नवीन सुरुवातीचा उत्सव साजरा

श्रीमती पेल्की त्शेरिंग, चीफ मार्केटिंग ऑफिसर, तनिष्क म्हणाल्या,”धनत्रयोदशी हा एक असा पावन मुहूर्त आहे, जेव्हा आपण समृद्धी, सकारात्मकता आणि नवीन सुरुवातीचा उत्सव साजरा करतो. हा सण तनिष्कसाठी देखील अतिशय विशेष आणि महत्त्वाचा आहे. ‘अध्यंतरा’च्या माध्यमातून, आम्हाला विश्वाच्या अथांग जादुई आकर्षणाचा आणि अद्भूत रहस्यांचा वेध घ्यायचा आहे, तसेच हे सौंदर्य महिलेच्या आणखी जवळ आणायचे आहे, जी आमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे.

आधुनिक दागिन्यांमध्ये जिवंत

आमच्यासाठी, प्रत्येक स्त्री स्वतःमध्येच एक संपूर्ण विश्व आहे जिच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत, जी सतत पुढे पाऊल टाकत आहे आणि जिच्या डोळ्यांत प्रत्यक्षात उतरण्याची वाट पाहणारी अगणित स्वप्ने आहेत. आमच्या डिझायनर्सनी खगोलीय आकृत्यांचे सौंदर्य, त्यांचे रहस्य आणि त्यांचे दिव्य तेज आधुनिक दागिन्यांमध्ये जिवंत केले आहे.

तृप्ति डिमरीने रचला इतिहास, आलिया-दीपिकालाही टाकलं मागे; आता इंटरनॅशनल स्तरावर करणार भारताचे प्रतिनिधित्व

हे कलेक्शन भारतीय कारीगरीचे वैभव आणि आजच्या काळातील आधुनिक दृष्टिकोन यांचा एक अद्भूत संगम आहे. या उत्सवाच्या काळात, ‘अध्यंतरा’ प्रत्येक स्त्रीला काहीतरी वेगळे पाहण्याचे, या अलौकिक सौंदर्याचा स्वीकार करण्याचे आणि या अद्भूत आनंदाचा उत्सव साजरा करण्याचे एक सुंदर आमंत्रण आहे.”

श्रीमती गरिमा माहेश्वरी, हेड ऑफ डिझाईन, तनिष्क म्हणाल्या,”अध्यंतरा’ने आम्हाला डिझाईनच्या एका संपूर्ण नवीन दृष्टिकोनातून विश्वाचा शोध घेण्याची एक सुवर्णसंधी दिली. आम्ही खगोलीय आकृत्यांची मंत्रमुग्ध करणारी हालचाल, प्रकाशाचा जादुई खेळ आणि विश्वातील अद्भूत गुंतागुंत यापासून प्रेरणा घेतली आहे.

‘अ‍ॅनिमल’ साठी ४० लाख तर, Spirit साठी घेतले एवढे कोटी रुपये; तृप्ती डिमरीच्या फी मध्ये ९०% वाढ

इनॅमलचे अनोखे तंत्र

आकाशातील हेच अनोखे चमत्कार आज या विलोभनीय आकृत्या आणि अत्यंत सूक्ष्म कारागिरीच्या रूपाने समोर आले आहेत. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी विलक्षण अचूकता आणि अजोड कौशल्याची गरज होती मग ते अप्रतिम 3D आकार असोत, थरांचे काम असलेली ‘बादरूम’ कला असो, पेटेंट मिळालेले 3D ग्लास कुंदन असो, किंवा हाताने कोरलेले स्टोन्स आणि इनॅमलचे अनोखे तंत्र असो.

याचा प्रत्येक भाग विश्वाचे एक वेगळे रूप स्वतःमध्ये सामावून घेतो, ज्यामुळे प्रकाश, खोली आणि आकाराचा एक संमोहन करणारा ताळमेळ तयार होतो. याचा परिणाम म्हणजे एक असे कलेक्शन आहे, जिथे कल्पनाशक्ती आणि नाविन्य यांचा संगम होतो; आणि तनिष्कच्या कसदार कारीगरीच्या माध्यमातून विश्वाच्या त्या अनंत जादुला एका अशा भाषेत गुंफले गेले आहे जी आधुनिक असण्यासोबतच सदाबहार देखील वाटते.”

💡

Frequently Asked Questions

  • Que: तनिष्कचे ‘अध्यंतरा’ कलेक्शन कशासाठी लाँच केले?

    Ans: धनत्रयोदशीच्या निमित्ताने हे कलेक्शन लाँच केले

  • Que: ‘अध्यंतरा’ कलेक्शनच्या कॅम्पेनमध्ये कोण आहे?

    Ans: अभिनेत्री तृप्ती डिमरी या कॅम्पेनमध्ये झळकत आहे.

  • Que: ‘अध्यंतरा’ कलेक्शनची प्रेरणा काय आहे?

    Ans: अथांग ब्रह्मांडाचे सौंदर्य आणि खगोलीय आकृत्या ही या कलेक्शनची प्रेरणा

Web Title: Tanishq adhyantara jewellery collection triptii dimri rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • jewellery
  • Tanishq
  • Triptii Dimri

संबंधित बातम्या

मिया बाय तनिष्कचे पुण्यात नवे स्टोअर; जंगली महाराज रोडवर फेस्टिव्ह सीझनची शानदार सुरुवात
1

मिया बाय तनिष्कचे पुण्यात नवे स्टोअर; जंगली महाराज रोडवर फेस्टिव्ह सीझनची शानदार सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.