Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भूक लागलीये पण जेवण बनवण्याचा कंटाळा आलाय? मग झटपट घरी बनवा हॉटेल स्टाईल ‘जिरा आलू’; काही मिनिटांतच तयार होईल रेसिपी

Jeera Aloo Recipe : उकडलेले बटाटे, मसाले आणि जिऱ्याचा तडका देऊन बनवलेली आलू जिरा रेसिपी अनेकांच्या आवडीची आहे. याची चटपटीत आणि मसालेदार चव जेवणाची मजा द्विगुणित करते. चला याची एक सोपी रेसिपी जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 14, 2025 | 12:33 PM
aloo jeera

aloo jeera

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय स्वयंपाकातील प्रत्येक पदार्थाला एक वेगळी चव, सुगंध आणि ओळख असते. त्यातल्या त्यात ढाब्यावरील पदार्थांची चव काही औरच असते. रस्त्याच्या कडेला दिसणाऱ्या ढाब्यांवर मिळणारे गरमागरम पराठे, भाजी, डाळ-फ्राय किंवा मसालेदार आलू-जीरा आपल्या चविष्टपणामुळे नेहमीच लक्षात राहतात. आलू-जीरा हा साधा पण तितकाच लोकप्रिय पदार्थ आहे.

५ मिनिटांमध्ये घरी बनवा केरळस्टाईल जाळीदार सॉफ्ट अप्पम, झटपट तयार होतील सकाळचा नाश्ता

उकडलेले बटाटे, भाजलेल्या जिऱ्याचा सुगंध आणि थोड्या मसाल्यांसह तयार होणारी ही भाजी फक्त भाकरी, रोटी किंवा पराठ्यासोबतच नाही तर दह्यासोबतही अप्रतिम लागते. विशेष म्हणजे, हा पदार्थ पटकन तयार होतो आणि हॉटेल स्टाईल तडका लागल्यामुळे त्याची चव दुप्पट होते. ही रेसिपी सोपी आणि झटपट तयार होत असल्याने कंटाळा आला तरी तुम्ही पटकन ती बनवून याची स्वादिष्ट चव चाखू शकता. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य :

  • बटाटे – ४ मध्यम (उकडून चौकोनी तुकडे केलेले)
  • जिरे – २ चमचे
  • हिरवी मिरची – २ बारीक चिरलेल्या
  • आलं-लसूण पेस्ट – १ चमचा
  • कांदा – १ मध्यम बारीक चिरलेला
  • टोमॅटो – १ मध्यम चिरलेला
  • धने पावडर – १ चमचा
  • हळद – ½ चमचा
  • लाल तिखट – १ चमचा
  • गरम मसाला – ½ चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – ३ चमचे
  • कोथिंबीर – सजावटीसाठी
कृती :
  • जिरा आलू बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यात जिरे टाका. जिरे तडतडू लागल्यावर सुगंध पसरतो.
  • आता त्यात हिरवी मिरची आणि आलं-लसूण पेस्ट घालून परतून घ्या.
  • कांदा घालून तो सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतावा.
  • त्यानंतर टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.
  • आता हळद, धने पावडर, लाल तिखट आणि मीठ घालून मसाला नीट परतावा.
  • उकडलेले बटाट्याचे तुकडे या मसाल्यात टाकून छान हलक्या हाताने मिक्स करा.
  • झाकण ठेवून ५ मिनिटे मंद आचेवर शिजवा, जेणेकरून बटाट्यांना मसाल्याची चव लागेल.
  • शेवटी गरम मसाला आणि वरून कोथिंबीर टाकून सजवा.
  • गरमागरम ढाबा स्टाईल आलू-जीरा भाजी रोटी, तवा पराठा किंवा साध्या गरम भातासोबत सर्व्ह करा.
    थोडं लोणचं आणि दही असेल तर मजा दुप्पट होते.
शाकाहारी खाणाऱ्यांसाठी पर्वणी! आता घरीच बनवा हॉटेल स्टाईल ‘व्हेज सीख कबाब’; चवीला मस्त अन् सर्वांच्या आवडीची ठरणारी डिश

FAQs (संबंधित प्रश्न)

जिरा आलू भाजीची खासियत काय?
अचानक घरी पाहुणे आल्यास किंवा कमी वेळात झटपट काहीतरी बनवायचे असल्यास ही भाजी बनवता येते.

जीरा आलू कशासोबत खाल्ली जाते?
जीरा आलू ही पोळी, रोटी किंवा भातासोबत खाल्ली जाते.

Web Title: Tasty and quick hotel style aloo jeera recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 12:33 PM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • potato recipe

संबंधित बातम्या

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असली तरी भेंडीची भाजी खायला कंटाळवाणी वाटते? मग एकदा ‘मसाला भेंडी’ बनवून पहा
1

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असली तरी भेंडीची भाजी खायला कंटाळवाणी वाटते? मग एकदा ‘मसाला भेंडी’ बनवून पहा

Food Recipe: १० रुपयांमध्ये बनवा खमंग कुरकुरीत शेंगदाणा खोबऱ्याची चटणी, महिनाभर राहील व्यवस्थित टिकून
2

Food Recipe: १० रुपयांमध्ये बनवा खमंग कुरकुरीत शेंगदाणा खोबऱ्याची चटणी, महिनाभर राहील व्यवस्थित टिकून

Valentine Day होईल आणखीनच खास! गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच बनवा ‘हे’ चविष्ट गोड पदार्थ
3

Valentine Day होईल आणखीनच खास! गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच बनवा ‘हे’ चविष्ट गोड पदार्थ

संध्याकाळच्या जेवणासाठी करा गरमागरम पांढरी कढी, घरातील सगळ्यांचं आवडेल चविष्ट पदार्थ
4

संध्याकाळच्या जेवणासाठी करा गरमागरम पांढरी कढी, घरातील सगळ्यांचं आवडेल चविष्ट पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.