Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालक खायला आवडत नाही, मग यापासून बनवा कुरकुरीत आणि चटपटीत चाट; चव चाखाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

Palak Chaat Recipe : पिठात कुरकुरीत तळलेल्या पालकाच्या पानांवर दही आणि चटण्यांचे ते आवरण पदार्थाची चव आणखीन सुंदर बनवते. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही ही पालक पत्ता चाट बनवून खाऊ शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 17, 2025 | 03:34 PM
पालक खायला आवडत नाही, मग यापासून बनवा कुरकुरीत आणि चटपटीत चाट; चव चाखाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

पालक खायला आवडत नाही, मग यापासून बनवा कुरकुरीत आणि चटपटीत चाट; चव चाखाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

Follow Us
Follow Us:
  • हिवाळ्यात पालेभाज्या स्वस्त होतात, यांचे सेवन आरोग्यासाठीही फायद्याचे ठरते
  • पालकाची भाजी आवडत नसल्यास यापासून चटपटीत चाट तायर करता येऊ शकते
  • चटणी, दही, कुरकुरीत पालक, मसाले आणि वरुन ते शेवेचे आवरण पदार्थाची चव द्विगुणत करते
भारतीय चाट म्हटली की डोळ्यासमोर येते ती चटपटीत चव, वेगवेगळ्या चटण्यांचा संगम आणि कुरकुरीत पदार्थांचा आनंद. रोजच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी वेगळं, हलकं आणि चविष्ट खायचं असेल तर पालक चाट हा एक उत्तम पर्याय आहे. ही रेसिपी खास करून दिल्ली स्टाईल चाटमध्ये खूप लोकप्रिय आहे, पण आता ती घराघरात सहज बनवली जाते.

Christmas 2025 : सणाचा गोडवा वाढवा, ओरिओ बिस्किटांपासून घरी बनवा ‘ख्रिसमस केक’

पालक ही भाजी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. त्यामध्ये लोह, कॅल्शियम, फायबर आणि अनेक जीवनसत्त्वे असतात. अनेकांना पालकाची भाजी किंवा भाजीचे पदार्थ आवडत नाहीत, पण पालक चाटच्या रूपात ती अगदी चवीने खाल्ली जाते. कुरकुरीत तळलेले पालक, गोड चिंचेची चटणी, हिरवी तिखट चटणी, दही आणि विविध मसाल्यांचा मेळ यामुळे या चाटला खास चव येते. पाहुण्यांसाठी स्टार्टर म्हणून किंवा कुटुंबासाठी संध्याकाळच्या स्नॅक्सला ही रेसिपी नक्कीच सर्वांना आवडेल.

 साहित्य

  • पालकाची मोठी पाने – 15 ते 20
  • बेसन – अर्धा कप
  • तांदळाचे पीठ – 2 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • लाल तिखट – अर्धा टीस्पून
  • हळद – चिमूटभर
  • ओवा – चिमूटभर
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • तेल – तळण्यासाठी
चाटसाठी
  • दही – अर्धा कप (फेटलेले)
  • चिंचेची गोड चटणी – 3 ते 4 टेबलस्पून
  • हिरवी चटणी – 2 टेबलस्पून
  • चाट मसाला – चवीनुसार
  • भाजलेले जिरे पूड – अर्धा टीस्पून
  • शेव किंवा बारीक फरसाण – सजावटीसाठी
हिवाळ्यात नक्की करून पहा पारंपरिक राजस्थानी स्टाईल कच्च्या ओल्या हळदीची भाजी, नोट करून घ्या पौष्टिक पदार्थ

कृती

  • यासाठी सर्वप्रथम पालकाची पाने स्वच्छ धुऊन पूर्ण कोरडी करून घ्या. देठ काढून बाजूला ठेवा.
  • एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, लाल तिखट, हळद आणि ओवा मिसळा. थोडं थोडं पाणी घालून जाडसर पीठ तयार करा.
  • प्रत्येक पालकाचं पान या पिठात नीट बुडवून घ्या.
  • कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर पालकाची पाने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. कागदावर काढून अतिरिक्त तेल काढा.
  • सर्व्हिंग प्लेटमध्ये तळलेली पालकाची पाने ठेवा. त्यावर फेटलेलं दही ओता.
  • आता त्यावर चिंचेची गोड चटणी आणि हिरवी चटणी घाला.
  • चाट मसाला, भाजलेली जिरे पूड टाका.
  • शेव किंवा फरसाण घालून लगेच सर्व्ह करा.
  • पालक पूर्ण कोरडी असतील तरच पीठ नीट चिकटते आणि चाट अधिक कुरकुरीत होते.
  • जास्त वेळ ठेवून दिल्यास पालक नरम पडतात, म्हणून चाट तयार झाल्यावर लगेच खावी.
  • दही फार आंबट नसावे, नाहीतर चाटची चव बदलते.
  • ही कुरकुरीत आणि चटपटीत पालक चाट एकदा घरी करून पाहा, नक्कीच सर्वांच्या पसंतीस उतरेल.

Web Title: Tasty evening snack know how to make palak chaat at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 03:34 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
3

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
4

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.