पिवळे दात कसे कराल स्वच्छ
दात पिवळे होणे ही एक सामान्य समस्या आहे जी अनेक लोकांना त्रास देते. अर्थातच पिवळे दात हे कोणालाही लाजिरवाणे वाटू शकतात. तुमच्या दातांचा रंग खराब झाल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात कारण ते तुमच्या दात आणि हिरड्यांमध्ये अडकलेल्या कुजणाऱ्या कणांमुळे होते, ज्याला प्लेक म्हणतात.
दात पिवळे पडल्याने तोंडाची दुर्गंधी येणे, दातांमधून रक्त येणे, पायरिया, हिरड्या दुखणे, दात किडणे, दात सैल होणे, पोकळी येणे इत्यादी समस्या उद्भवतात. हेच कारण आहे की ते प्रथम प्लेकच्या स्वरूपात जमा होते आणि नंतर ते टार्टरचे रूप धारण करून मुळांमध्ये जाते, ज्यामुळे समस्या सुरू होतात. पिवळे दात कसे पांढरे करावे? दात आणि हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी, हा प्लेक काढून टाकणे महत्वाचे आहे जो तुमच्या सामान्य टूथपेस्टने काढता येत नाही. दात पांढरे करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता. खाली एक प्रभावी उपाय दिला आहे जो इन्स्टा पेजवरील @anubeauty.tips यावरून आम्ही देत आहोत (फोटो सौजन्य – iStock)
दात स्वच्छ करण्यासाठी साहित्य
दात स्वच्छ कऱण्यासाठी मिश्रण घरी कसे बनवाल
रोज ब्रश करूनही दातांवर साचतोय पिवळा थर? कारण आणि सोपे घरगुती उपाय
मिश्रण कसे तयार करावे
कधी आणि कसा वापर करावा
या मिश्रणाचा दातांवर कसा वापर करावा
हा उपाय आठवड्यातून दोनदा वापरावा. सकाळी दात घासावे लागतात तेव्हा तुम्ही घरगुती मिश्रणाचा वापर करून घेऊ शकता. या मिश्रणाचा वापर केल्याने काही दिवसांतच तुमचे पिवळे दात पांढरे होऊ लागतील. दातांवर जमा झालेला घाणीचा पिवळा थर लवकरच यामुळे कमी होईल आणि दात त्वरीत पांढरेशुभ्र दिसून येतील.
दातांवरील पिवळ्या थरामुळे हसणं होतंय कठीण? सोपा घरगुती उपाय चमकवेल दात हिऱ्यासारखे
काय आहे फायदा
दात होतील त्वरीत स्वच्छ
आठवड्यातून दोनदा हे मिश्रण वापरल्याने दात आणि हिरड्यांवरील प्लाक काढून टाकण्यास मदत होतेच, शिवाय तोंडाची पीएच पातळी देखील राखली जाते आणि पोकळी आणि दातदुखीपासून आराम मिळतो. दातदुखी असेल अथवा दातांमधील पोकळीमध्ये त्रास होत असेल तर तुम्ही घरी तयार केलेल्या या मिश्रणाचा दात घासण्यासाठी वापर करावा असे या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.
दात कसे कराल त्वरीत स्वच्छ
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.