देशात स्कंदमतेचे फक्त दोनच मंदिर; पाचव्या स्वरूपात विराजमान आहे देवी, दुष्ट शक्तीपासून भाविकांचे करते रक्षण
नवरात्रीच्या काळात देवीच्या नऊ स्वरूपांची पूजा केली जाते. त्यामधील पाचवे स्वरूप म्हणजे माता स्कंदमाता. या स्वरूपात माता भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि संकटांपासून रक्षण करतात, असे मानले जाते. आज नवरात्रीचा पाचवा दिवस, हा दिवस देवी स्कंदमातेला समर्पित असून या दिवशी ती भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते अशी मान्यता आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? भारतातील अनेक ठिकाणी स्कंदमातेची मंदिरे आहेत. त्यापैकी वाराणसी आणि मध्य प्रदेशातील विदिशा येथील मंदिरे विशेष प्रसिद्ध आहेत. नवरात्रीत या मंदिरात भक्तांची गर्दीच गर्दी पाहायला मिळते.
वाराणसी
पुरोहित आणि ज्योतिष जाणकारांच्या मते वाराणसीच्या जगतपुरा परिसरातील बागेश्वरी देवी मंदिरात दुर्गेच्या पाचव्या स्वरूपातील माता स्कंदमाता विराजमान आहेत. या स्वरूपाचा उल्लेख काशीखंड आणि देवीपुराण ग्रंथांमध्ये आढळतो. या मंदिरात येणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांना मोक्ष मिळतो असे मानले जाते. हे मंदिर जैतपुरा पोलीस स्टेशनच्या जवळ आहे, त्यामुळे रिक्षाने येथे पोहोचणे सोपे आहे.
काशीचे रक्षण करणाऱ्या माता
एकदा देवासुर नावाच्या राक्षसाने वाराणसीत संत आणि सामान्य जनतेवर अत्याचार सुरू केले. त्यावेळी स्कंदमातेने त्याचा संहार करून भक्तांचे रक्षण केले. त्या घटनेनंतर येथे मातेस पूजले जाऊ लागले. मान्यता अशी आहे की माता येथेच विराजमान झाल्या असून काशीतील दुष्ट शक्तींपासून लोकांचे रक्षण करतात. नवरात्रीत सकाळी ६.३० वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत दर्शन घेता येते. नवरात्रीच्या काळात मंदिर पूर्णवेळ खुले असते, तर सामान्य दिवसांत दुपारी मंदिर बंद ठेवले जाते. येथे दर्शन केल्यास माता सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात, असा विश्वास आहे.
देशात या ठिकाणी आहे कुश्मांडा देवीच प्राचीन मंदिर, फक्त पाणी लावल्याने डोळ्यांचे आजार होतात बरे
विदिशा
मध्य प्रदेशातील विदिशा शहरात जुना बसस्टँड आणि सांकलकुआनजवळ दुर्गाजीचे भव्य मंदिर आहे. येथेही स्कंदमाता स्वरूप विराजमान आहे. या मंदिराची स्थापना १९९८ मध्ये झाली. मंदिराचे पुजारी सांगतात की सुमारे ४०–४५ वर्षांपूर्वी या ठिकाणी दुर्गेची झांकी सजवली जात होती. भक्तांच्या मनात देवीविषयी अखंड श्रद्धा जागृत झाली आणि या ठिकाणी स्कंदमाता मंदिर उभारण्यात आले. नवरात्रीच्या पंचमीला येथे विशेष आरती केली जाते आणि मंदिरात अखंड ज्योत प्रज्वलित ठेवली जाते.